प्रतिकात्‍मक छायाचित्र.  
ज्योतिष आणि धार्मिक

Surya Gochar 2026 |सूर्याचे केतूच्या नक्षत्रात राशीपरिवर्तन; 'या' राशींचे उजळणार नशीब

Surya Gochar 2026 | १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ०९ वाजून ३८ मिनिटांनी सूर्य देव अश्विनी नक्षत्रात प्रवेश करतील

पुढारी वृत्तसेवा

Surya Gochar 2026

मुंबई : ग्रहांचा राजा सूर्य वेळोवेळी आपले नक्षत्र बदलत असतो. हिंदू पंचांगानुसार, सध्या सूर्य रेवती नक्षत्रात संचार करत आहे. लवकरच सूर्य नक्षत्र परिवर्तन करणार आहे. १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ०९ वाजून ३८ मिनिटांनी सूर्य देव अश्विनी नक्षत्रात प्रवेश करतील. अश्विनी नक्षत्राचा स्वामी केतू मानला जातो. २७ एप्रिलपर्यंत सूर्याचे वास्तव्य केतूच्या अश्विनी नक्षत्रात असेल. सूर्याच्या या नक्षत्र बदलाचा प्रभाव मेष ते मीन अशा सर्व १२ राशींवर पाहायला मिळेल. सूर्याच्या अश्विनी नक्षत्रातील या गोचरमुळे कोणत्या राशींना फायदा होणार ते जाणून घेऊया.

सिंह राशीच्‍या जातकांना अचानक धनलाभाची शक्‍यता

केतूच्या अश्विनी नक्षत्रात सूर्याचे आगमन सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ वार्ता घेऊन येऊ शकते. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, करिअरशी संबंधित काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या किंवा प्रकल्प मिळू शकतात. आरोग्य उत्तम राहील. काही जातक प्रवासाला जाऊ शकतात, तर काहींची नवीन लोकांशी भेट होणे शक्य आहे. तुमचा आत्मविश्वास दांडगा राहील.

मेष राशीचे जातक सकारात्‍मक बदल अनुभवतील

मेष राशीच्या लोकांसाठी हे गोचर सकारात्मक बदल घडवून आणणारे ठरेल. धनलाभाचे नवीन मार्ग शोधण्यात या बदलाची मदत होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होताना दिसेल. दरम्यान, घरात शांततेचे वातावरण राखण्याचा प्रयत्न करा आणि विनाकारण होणारे वादविवाद टाळा. नोकरीच्या ठिकाणी तुमचा मान-सन्मान वाढेल.

धनु राशीच्‍या जातकांना लाभेल जोडीदाराची साथ

सूर्याचे हे राशीपरिवर्तन धनु राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. नोकरीमध्ये आखलेल्या योजना यशस्वी होतील. जोडीदाराची साथ मिळेल आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल. आरोग्याची काळजी घ्या आणि घरातील वृद्धांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. या गोचरमुळे तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल.

टीप: वरील ज्योतिषशास्त्रावरील माहिती ही इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची जन्‍मपत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT