Sun Transit Astrology file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Sun Transit Astrology: सूर्य-शनीची घातक युती! पुढील काही दिवस 'या' राशींसाठी कठीण; चुकूनही करू नका 'या' चुका!

वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे राशी परिवर्तन आणि त्यांची युती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो, तेव्हा त्याचा प्रभाव सर्व १२ राशींवर पडत असतो.

पुढारी वृत्तसेवा

Sun Transit Astrology

वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे राशी परिवर्तन आणि त्यांची युती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो, तेव्हा त्याचा प्रभाव सर्व १२ राशींवर पडत असतो. पंचांगानुसार, नुकताच असाच एक मोठा बदल झाला असून सूर्यदेवाने मीन राशीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, या राशीत आधीच शनी विराजमान असल्याने आता सूर्य-शनीची युती झाली आहे. ज्योतिषशास्त्रात ही युती काही राशींसाठी आव्हानात्मक ठरू शकते.

मीन राशीत ग्रहांचा खेळ

द्रिक पंचांगानुसार, १५ मार्चच्या मध्यरात्री (सुमारे १ वाजून ८ मिनिटांनी) सूर्याने मीन राशीत प्रवेश केला. मीन ही गुरूची रास असून तिथे सध्या शनी आणि शुक्र देखील उपस्थित आहेत. सूर्य आणि शनी यांचे एकत्र येणे अनेकदा जीवनात मानसिक दबाव आणि आव्हाने वाढवणारे ठरते. त्यातच केतूची स्थितीही विशिष्ट योग बनवत असल्याने खालील चार राशींना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

'या' ४ राशींवर होणार परिणाम

१. मेष

मेष राशीच्या जातकांसाठी हा गोचर बाराव्या भावात होत आहे. यामुळे अचानक खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आरोग्याशी संबंधित तक्रारींमुळे पैसा खर्च होऊ शकतो. आर्थिक नियोजन कोलमडू नये यासाठी अनावश्यक खर्च टाळणे आणि बजेटवर नियंत्रण ठेवणे या काळात अत्यंत आवश्यक आहे.

२. सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींना या काळात सावध राहावे लागेल. सूर्य तुमच्या राशीतून आठव्या भावात भ्रमण करणार असून त्यावर केतूचाही प्रभाव असेल. सरकारी कामे, न्यायालयीन प्रकरणे किंवा कायदेशीर कागदपत्रांच्या बाबतीत कोणतीही निष्काळजीपणा करू नका. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.

३. तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ कामकाजाच्या ठिकाणी दबाव वाढवणारा असेल. सूर्याचे सहाव्या भावातील आगमन जबाबदाऱ्यांचा बोजा वाढवू शकते. घाईघाईत घेतलेला कोणताही निर्णय अंगाशी येऊ शकतो. कार्यक्षेत्रात किंवा नातेसंबंधात टीकेला सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याने संयम बाळगणे हिताचे ठरेल.

४. मीन

सूर्य तुमच्याच राशीत प्रवेश करत असून तिथे आधीच शनी उपस्थित आहे. त्यामुळे या बदलाचा सर्वाधिक प्रभाव तुमच्यावरच दिसून येईल. करिअर, कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्यात चढ-उतार येऊ शकतात. आर्थिक व्यवहार करताना विचारपूर्वक पावले उचला. कामाचा ताण घरापर्यंत नेऊ नका; कौटुंबिक शांतता राखण्यासाठी संतुलन ठेवावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT