Shukraditya Yog 2026 file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Shukraditya Yog 2026: आज 'शुक्रादित्य'सह 'अर्धकेंद्र' योगाचा दुर्मिळ संयोग; 'या' ३ राशींच्या आयुष्यात येणार सुख आणि पैसा!

आज, १४ एप्रिल रोजी आकाशात अशाच एका विशेष योगाचा संयोग जुळून येत आहे. यामुळे काही राशींच्या नशिबाची दारे उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Shukraditya Yog 2026:

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती आणि त्यांच्यातील युती मानवी जीवनावर खोलवर परिणाम करत असते. आज, १४ एप्रिल रोजी आकाशात अशाच एका विशेष योगाचा संयोग जुळून येत आहे. शुक्र ग्रह सूर्याशी संयोग साधून 'शुक्रादित्य योग' निर्माण करेल. त्याच वेळी, शुक्र ग्रह 'वरुण' देवाशी संयोग साधून 'अर्ध केंद्र योग' निर्माण करेल.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रहाला अत्यंत प्रभावशाली ग्रह मानले जाते. हा ग्रह प्रेम, धनसंपत्ती, भौतिक सुखसोयी, विलासी जीवन आणि नातेसंबंधांचे प्रतिनिधित्व करतो. परिणामी, जेव्हा जेव्हा शुक्र आपली स्थिती बदलतो किंवा एखाद्या दुसऱ्या ग्रहाशी एखादा विशिष्ट योग (संयोग) निर्माण करतो, तेव्हा त्याचे परिणाम सर्व राशींवर जाणवतात.

सध्या शुक्र हा मेष राशीत विराजमान आहे. दृक पंचांग'नुसार, शुक्राची सूर्यासोबत युती झाल्याने 'शुक्रादित्य योग' तयार होत आहे. तर दुसरीकडे, मीन राशीत असलेल्या वरुण ग्रहाशी शुक्राचा ४५ अंशांचा कोन होत असल्याने 'अर्धकेंद्र योग' जुळून येत आहे. या दुहेरी योगाचा सकारात्मक प्रभाव प्रामुख्याने खालील तीन राशींवर दिसून येईल.

या राशींना होणार विशेष लाभ

१. मेष : प्रलंबित कामे मार्गी लागणार

मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ सकारात्मक बदलांचा ठरेल. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आता पूर्णत्वास जातील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते. व्यवसायात लाभ मिळण्याचे संकेत आहेत. समाजात मान-सन्मान वाढेल आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील.

२. वृषभ : आर्थिक संकटातून सुटका

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा योग अत्यंत दिलासादायक ठरणार आहे. विशेषतः आर्थिक आघाडीवर मोठे बदल पाहायला मिळतील. वायफळ खर्चावर नियंत्रण येईल आणि जुन्या कर्जातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. मानसिक ताण कमी होऊन जीवनात संतुलन येईल. कामावर लक्ष केंद्रित केल्यास मोठे यश संपादन करता येईल.

३. कुंभ : भाग्याची भक्कम साथ

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्योदयाचा ठरू शकतो. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून येतील. नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढीचे योग आहेत. व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची चिन्हे आहेत. अडकलेले पैसे परत मिळतील, ज्यामुळे आर्थिक बाजू भक्कम होईल. नात्यांमधील दुरावा कमी होऊन गोडवा वाढेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT