Shukra Gochar 2026 : ज्योतिषशास्त्रात शुक्र हा सौंदर्य, सुख-सुविधा, प्रेम आणि ऐश्वर्य देणारा ग्रह मानला जातो. त्यामुळेच शुक्राचे गोचर (राशी किंवा नक्षत्र बदल) अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. शुक्राच्या या बदलाचा प्रभाव मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्वच राशींवर पाहायला मिळतो. सध्या शुक्र हा सूर्यदेवाच्या सिंह राशीत विराजमान आहे. आता काही तासांतच शुक्र एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
हिंदू पंचांगानुसार, १६ जुलै २०२६ रोजी संध्याकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी शुक्र 'पूर्वाफाल्गुनी' नक्षत्रात प्रवेश करेल. विशेष म्हणजे, पूर्वाफाल्गुनी नक्षत्राचा स्वामी स्वतः शुक्र ग्रहच आहे. अशा परिस्थितीत आपल्याच नक्षत्रात शुक्राचे गोचर करणे अत्यंत फायदेशीर मानले जात आहे. शुक्र या नक्षत्रात २८ जुलै २०२६ पर्यंत राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, मेष, सिंह, तुला आणि धनु या ४ राशींच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर आणि भाग्यशाली ठरणार आहे.
मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे गोचर सकारात्मक निकाल घेऊन येईल. तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणि आनंदाचे वातावरण राहील. जे लोक सिंगल आहेत, त्यांना प्रेमाच्या बाबतीत काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच, धनवृद्धीचे मजबूत योग जुळून येत आहेत.
तुला राशीच्या लोकांसाठी हे गोचर अत्यंत शुभ ठरेल. तुमचा ओढा धार्मिक कार्यांकडे वाढेल. कामाच्या किंवा व्यवसायाच्या निमित्ताने थोडे प्रवास करावे लागतील, जे फायदेशीर ठरतील. कुटुंबातून किंवा मित्रपरिवाराकडून एखादी चांगली बातमी कानावर पडू शकते.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरणार आहे. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. आईच्या आरोग्यात आधीपेक्षा चांगली सुधारणा पाहायला मिळेल. तसेच, बऱ्याच काळापासून जाणवणारी पैशांची चणचण किंवा आर्थिक अडचणी आता दूर होऊ शकतात.
धनु राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे नक्षत्र गोचर वरदान ठरेल. वैवाहिक आयुष्यात गोडवा वाढेल आणि जोडीदारासोबतचे संबंध दृढ होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत भाग्याचा आणि प्रगतीचा असणार आहे.
टीप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.