ज्योतिष आणि धार्मिक

Shravan Month: श्रावण महिना कधीपासून? सणांची तारीख-वार एका क्लिकवर

आध्यात्मिकसह विविध सणांचा उत्सवी महिना श्रावण

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : हिंदू संस्कृतीतील श्रावण हा आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. ऑगस्टचा महिना निसर्गपूजेसह हिरवाईने नटणार आहे. श्रावणास १३ ऑगस्टपासून प्रारंभ होईल. यात भगवान शिवशंकराची उपासना, ध्यान धारणा होईल. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे. ऑगस्ट महिन्यातील उल्लेखनीय सण, वार, उत्सवाची माहिती दै. पुढारीच्या वाचकांसाठी...

प्रमुख सण व उत्सव (ऑगस्ट २०२६)

  • १ ऑगस्ट : लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती.

  • ९ ऑगस्ट : क्रांती दिन

    १९४२ मध्ये याच दिवशी महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध 'भारत छोडो' आंदोलनाची घोषणा केली होती.

  • १० ऑगस्ट : संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा

    आषाढ वद्य त्रयोदशी रोजी पंढरपुरातील नामदेव पायरी व संत नामदेव महाराज मंदिरात भक्तिभावाने साजरी होतो.

  • ११ ऑगस्ट : संत सावता माळी पुण्यतिथी

    आषाढ वद्य चतुर्दशी या तिथीला साजरी होते.

  • १५ ऑगस्ट : भारताचा स्वातंत्र्य दिन

    १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत मुक्त झाला. शाळा, संस्था, शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करीत देशभक्तांच्या विचारńca जागर होतो.

  • १७ ऑगस्ट : नागपंचमी

    श्रावण शुद्ध पंचमी या तिथीला नागदेवतेची पूजा करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू धर्मातील प्राचीन परंपरा आहे.

  • २७ ऑगस्ट : नारळी पौर्णिमा

    येत्या २७ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा असून, यादिवशी वरूण देवतेची पूजा केली जाती. या पौर्णिमेला पदशाली बांधव नूलुपून साजरी करतात.

  • २८ ऑगस्ट : रक्षाबंधन

    बहिणीकडून रक्षणासाठी भावाला रक्षाबंधन करून ओवाळणी करण्याची प्रथा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT