Frog Temple Lakhimpur Kheri file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Shiva Temple: नंदी नव्हे, तर बेडकावर बसलेत महादेव! या अनोख्या शिव मंदिराचे रहस्य माहितीये का?

तुम्ही भगवान शंकर नंदीवर नव्हे, तर चक्क बेडकावर विराजमान असल्याचे मंदिर पाहिले किंवा ऐकले आहे का?

पुढारी वृत्तसेवा

Frog Temple Lakhimpur Kheri

लखीमपुर खीरी: देशभरात भगवान शंकराची अनेक भव्य आणि प्राचीन मंदिरे आहेत, ज्यांच्याशी संबंधित विविध श्रद्धा आणि मान्यता प्रचलित आहेत. पण, तुम्ही भगवान शिव नंदीवर नव्हे, तर चक्क बेडकावर विराजमान असल्याचे मंदिर पाहिले किंवा ऐकले आहे का?

उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी जिल्ह्यात हे आगळेवेगळे मंदिर आहे, जे आपल्या वास्तुशैलीमुळे प्रसिद्ध आहे. 'बेडूक मंदिर' म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर वास्तुकलेचा एक अद्भूत नमुना मानले जाते. ओयल या छोट्याशा गावात हे 'नर्मदेश्वर महादेव मंदिर' वसलेले आहे. लखीमपुर-सीतापुर मार्गावर लखीमपुरपासून साधारण १२ किमी अंतरावर हे मंदिर आहे. हे पूर्ण मंदिर एका मोठ्या बेडकाच्या आकाराच्या चबुतरावर बांधण्यात आले असल्याने याला स्थानिक भाषेत 'मेंढक मंदिर' असे म्हटले जाते. श्रावण महिना आणि महाशिवरात्रीला येथे भाविकांची मोठी गर्दी असते.

शिवलिंगाचा दिवसातून तीन वेळा बदलतो रंग

या मंदिराचे बांधकाम राजस्थानी वास्तुशैलीवर आधारित असून ते 'मांडूक तंत्रा'नुसार तयार करण्यात आले आहे. या तंत्रामुळेच मंदिराचा पाया एका महाकाय बेडकाच्या रूपात आहे. सामान्यतः सर्व शिवमंदिरांमध्ये नंदी महाराज बसलेल्या अवस्थेत असतात. मात्र, या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील नंदीची मूर्ती उभ्या मुद्रेत आहे, जे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. मंदिरातील शिवलिंग नर्मदा नदीतून आणलेले असून, या शिवलिंगाबाबत अशी श्रद्धा आहे की, ते दिवसातून तीन वेळा स्वतःचा रंग बदलते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT