प्रातिनिधिक छायाचित्र.  pudhari
ज्योतिष आणि धार्मिक

Shani Uday 2026 | मार्च २०२७ पर्यंत 'या' ३ राशींवर असणार शनीची विशेष नजर; जाणून घ्या परिणाम

Shani Uday 2026 | काही राशींसाठी शनी देवाची कृपा घेऊन येईल सुवर्णसंधी

नंदू लटके

Shani Uday 2026

ज्योतिषशास्त्रानुसार, शनी हा कर्म आणि न्यायाचा देवता मानला जातो. जेव्हा जेव्हा शनीची स्थिती बदलते किंवा शनीचा उदय होतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. यावेळी शनी ग्रहाचा मीन राशीत उदय झाला असून, तो २६ मार्च २०२७ पर्यंत याच अवस्थेत राहणार आहे. यामुळे अनेक राशींसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरेल. विशेषतः ज्या राशींवर शनीची मजबूत स्थिती आहे, त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन येईल. ज्योतिषशास्त्रीय भाषेत सांगायचे तर, या काळात काही राशींवर शनी 'सोन्याच्या पायाने' विराजमान आहे, म्हणजेच या राशींना शनीचे अतिशय शुभ आणि सकारात्मक फळ मिळू शकते.

वृषभ

वृषभ राशीच्‍या जातकांसाठी प्रगतीचा काळ

वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगती आणि दिलासा देणारा ठरेल. तुमच्या मनातील अनेक दिवसांपासूनच्या प्रलंबित इच्छा आता पूर्ण होऊ शकतात. स्वतःचे घर किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न साकार होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि बचतीत वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे, तर व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. केवळ नातेसंबंधांमध्ये संयम ठेवा आणि बोलण्यात गोडवा कायम ठेवा.

तूळ

तूळ राशीच्‍या जातक अनुभवतील सकारात्‍मक बदल

तुला राशीसाठी शनीचा उदय सकारात्मक बदल घडवणारा ठरेल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. नवीन नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि खर्चावर नियंत्रण राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टांचे कौतुक होईल. मात्र, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि थोडी काळजी घ्या.

मीन

मीन राशीच्‍या जातकांसाठी संमिश्र स्‍वरुपाचा काळ

मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ संमिश्र स्वरूपाचा असेल. शनी सध्या याच राशीत असून साडेसातीचा प्रभावही सुरू आहे. अशा परिस्थितीत खर्चात वाढ होऊ शकते, त्यामुळे गुंतवणुकीचा कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. पैसा आणि मालमत्तेच्या व्यवहारात सतर्क राहणे आवश्यक आहे. तब्येतीची काळजी घ्या. हा काळ जरी आव्हानात्मक असला तरी तो तुम्हाला बरेच काही शिकवून जाईल, ज्याचा भविष्यात फायदा होईल.

या बदलाचा नेमका अर्थ काय?

शनीचा उदय होणे म्हणजे केवळ चांगले किंवा वाईट फळ मिळणे असा होत नाही; तर शनी तुमच्या कर्मांनुसार न्याय देतो. ज्यांनी प्रामाणिक मेहनत केली आहे, त्यांना या काळात नक्कीच यश मिळेल. मात्र, कामात निष्काळजीपणा करणाऱ्यांनी सावध राहणे गरजेचे आहे. थोडक्यात सांगायचे तर, जे लोक संयम बाळगतात आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतात, त्यांच्यासाठी येणारा काळ सुखकर असेल. शनीचे फळ मिळण्यास वेळ लागतो, पण ते दीर्घकाळ टिकणारे असते.

टीप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT