Shani Nakshatra Gochar : शनीचे नक्षत्र परिवर्तन; या 4 राशींवर संकटाची छाया, राहा सावध! file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Shani Nakshatra Gochar : शनीचे नक्षत्र परिवर्तन; या 4 राशींवर संकटाची छाया, राहा सावध!

ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात चार राशींच्या व्यक्तींनी विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

पुढारी वृत्तसेवा

Shani Nakshatra Transit: Saturn changes its Nakshatra; a shadow of trouble looms over these 4 zodiac signs—stay cautious

पुढारी ऑनलाईन : 2 जुलै 2026 रोजी शनीचा रेवती नक्षत्रात गोचर होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात चार राशींच्या व्यक्तींनी विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जाणून घ्या तुमच्या राशीवर याचा काय परिणाम होऊ शकतो आणि कोणती काळजी घ्यावी.

ज्योतिषशास्त्रात शनीदेवाचे गोचर अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचे मानले जाते. त्याच अनुषंगाने, गुरुवार, 2 जुलै 2026 रोजी सकाळी 8.22 वाजता शनी रेवती नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करणार आहेत. ग्रहांच्या या बदलत्या स्थितीचा परिणाम सर्व राशींवर होणार असला, तरी ज्योतिषीय गणनेनुसार चार राशींनी विशेष सतर्क राहण्याची गरज आहे.

शनीच्या गोचरामुळे संभाव्य आव्हाने

मेष :

या काळात मेष राशीच्या व्यक्तींनी आर्थिक बाबतीत विशेष सावध राहावे. धनहानीची शक्यता असल्याने कोणतीही गुंतवणूक करताना पूर्ण विचार करा. अनावश्यक खर्च वाढल्याने बजेट बिघडू शकते आणि मानसिक तणावही वाढू शकतो. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करणे आवश्यक आहे.

सिंह :

सिंह राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी तणावाचा सामना करावा लागू शकतो. सहकारी किंवा वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता असून त्यामुळे कामाचे वातावरण बिघडू शकते. करिअरमध्ये चढ-उतार, तसेच सुरू असलेल्या कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. वाणीवर संयम ठेवा आणि वाद टाळण्याचा प्रयत्न करा.

वृश्चिक :

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात समतोल राखण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. जुने वाद किंवा प्रलंबित प्रकरणे पुन्हा समोर येऊ शकतात, ज्यामुळे मानसिक अस्वस्थता वाढू शकते. आर्थिक व्यवहार करताना कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. आरोग्याकडेही विशेष लक्ष द्या, कारण किरकोळ त्रासही कामात अडथळा निर्माण करू शकतो.

कुंभ :

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी या काळात अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यता आहे. स्वतःच्या किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबाबत चिंता निर्माण होऊ शकते. विनाकारण प्रवास आणि धावपळ टाळा, कारण त्यातून थकवा वाढण्याची शक्यता आहे. बोलताना संयम बाळगा, अन्यथा छोट्या गोष्टीचे मोठ्या वादात रूपांतर होऊ शकते.

टीप : वरील माहिती ही ज्योतिषशास्त्रातील मान्यता आणि श्रद्धांवर आधारित आहे. याला वैज्ञानिक आधार असल्याचा दावा करता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT