Shani Asta 2026 Pudhari Photo.
ज्योतिष आणि धार्मिक

Shani Asta 2026: शनी अस्त, साडेसातीमध्ये मिळणार मोठा दिलासा... या तीन राशींना होणार फायदा

Anirudha Sankpal

Shani Asta 2026: ज्योतिष शास्त्रामध्ये शनीला कर्माची फळे देणारा ग्रह मानलं जातं. शनी हा सर्वात कमी गतीनं चालणारा ग्रहांपैकी एख आहे. हा ग्रह एका राशीत जवळपास अडीच वर्षे राहतो. यामुळं शनीचा प्रभाव दीर्घकाळ राहतो अशी मान्यता आहे. यंदा शनी मीन राशीमध्ये आहे आणि २ जून २०२७ पर्यंत तो तिथंच राहणार आहे. यादरम्यान, शनी कधी वक्री, कधी माग्री कधी अस्त-उदय अवस्थेत असतो.

द्रिक पंचांगानुसार १३ मार्च २०२६ रोजी शुक्रवारी सायंकाळी ७ वाजून १३ मिनिटांनी शनी मीन राशीत अस्त अवस्थेत जाणार आहे. शनी जवळपास ४० दिवस अस्त स्थितीत राहणार आहे. त्यानंतर २२ एप्रिल २०२६ रोजी बुधवारी सकाळी ४ वाजून ४९ मिनिटांनी शीन पुन्हा उदय अवस्थेत असणार आहे. यादरम्यान तीन राशींवर या स्थितीचा प्रभाव पडणार आहे.

१ मेष राशी

मेष राशीसाठी शनीचा अस्त हा दिलासादायक ठरणार आहे. तुमच्या कुंडलीतील बाराव्या भाव मध्ये शनी अस्त होणार आहे. या राशीच्या लोकांच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. यामुळं खर्चांवर नियंत्रण येऊ शकतं. आर्थिक स्थिती हळू हळू सुधरू शकते. आरोग्याच्या समस्यांमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याच्या कामात यश मिळेल. जी कामे अनेक दिवसांपासून अडकली होती ती आता प्रगतीपथावर जातील. मात्र असं असलं तरी कामाच्या ठिकाणी वादांपासून दूर राहणे आणि सतर्क राहणे गरजेचे आहे.

२ वृश्चिक राशी

वश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ अनेक गोष्टीत फलदायी ठरणार आहे. शनी तुमच्या पाचव्या स्थानावर अस्त होणार आहे. त्यामुळं तुमचा आत्मविश्वास वाढणार असून थांबलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. नोकरी आणि व्यवसायात दोन्ही ठिकाणी प्रगती होऊ शकते. प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यापार करणाऱ्यांना नवीन ऑर्डर किंवा डील मिळण्याची शक्यता आहे. असं असलं तरी अभ्यास आणि मुलाबाळांच्या संबंधित गोष्टींची चिंता वाढण्याची शक्यता आहे. इथं निष्काळजीपणा करू नये. खर्चावर देखील नियंत्रण ठेवलं पाहिजे.

३ कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांना शनी अस्ताचा संमिश्र प्रभाव दिसणार आहे. एकूण पाहिलं तर शनी अस्त फायदेशीर ठरणार आहे. शनी तुमच्या दुसऱ्या स्थानात अस्त होणार आहे. तुमचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. या काळात उत्पन्नाचे नवे रस्ते निर्माण होतील. मेहनतीचं फळ मिळले. नोकरीच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. संपत्तीच्या दृष्टीकोणातून देखील लाभ मिळणार आहे. मात्र या काळात तुमच्या वागण्या बोलण्यात कठोरता येऊ शकते. त्यामुळं नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळं विचार करून बोला आणि खर्चावर नियंत्रण ठेवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT