Shani retrograde 2024
शनी आज म्हणजेच शनिवारी २९ जूनला वक्री होत आहे. File Photo
ज्योतिष आणि धार्मिक

Shani Retrograde | शनी वक्री उद्यापासून; 'या' राशींना पुढील साडेचार महिने खडतर

चिराग दारुवाला

शनिदेव हा सूर्यपूत्र आहे. तो न्याय आणि कर्म यांचा देवता आहे. हा शनी उद्या म्हणजेच शनिवारी २९ जूनला वक्री होत आहे. शनीला ज्योतिषशास्त्रात फार महत्त्व दिलेले आहे. शनी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी कुंभ राशीत वक्री होत आहे. शनी या स्थितीत पुढील साडेचार महिने म्हणजे १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत आहे.

जेव्हा ग्रह वक्री असतो, तेव्हा तो पृथ्वीपासून जवळ असतो. त्यामुळे या ग्रहाचे परिणामही जास्त राहातात. म्हणूनच शनी किंवा दुसरा कोणताही ग्रह वक्री झाला तर त्याचे शुभ आणि अशुभ असे दोन्ही परिणाम मिळत असतात.

  • शनी सूर्यपुत्र आणि न्याय, कर्म यांचा देवता आहे.

  • २९ जून २०२४ला शनी कुंभ राशीत वक्री होत आहे.

  • ज्याच्या राशींना आधीच साडेसाती सुरू आहे, त्यांनी जास्त दक्ष राहावे

  • काही राशींना शुभफलदायी आहे, तर काही राशींना वक्री शनी त्रासदायक आहे

  • शनी या या स्थितीत १५ नोव्हेंबर २०२४पर्यंत असेल

शनी वक्री अशुभ असतो का?

शनी वक्री असताना तो फार त्रासदायक असतो. ज्या राशींनी आधीच साडेसाती सुरू आहे, किंवा दहिया सुरू आहे त्यांनी अधिक दक्ष राहण्याची आवश्यकता असते.

मकर, कुंभ आणि मीन या राशींना साडेसाती सुरू आहे. तर कुंभ राशीला साडेसातीचा दुसरा, तर मकर राशीला अखेरचा तर मीन राशीला शेवटचा टप्पा सुरू आहे. या राशींना शनी वक्री होण्याचा त्रास अधिक संभवतो. तर कुंभ, कर्क आणि धनू यांच्यावर शनीच्या दहियाचा प्रभाव आहे.

शनी सर्वांत संथ गतीने मार्गक्रमण करणारा ग्रह आहे. जेव्हा तो वक्री होतो, तेव्हा बऱ्याच राशींना त्रासदायक ठरतो. पण प्रत्येक राशीसाठी शनी वक्री होणे अशुभ नसते. काही राशींना वक्री शनी चांगली फळेही देतो.

शनिदेव हा सूर्यपूत्र आहे. तो न्याय आणि कर्म यांचा देवता आहे. हा शनी आज म्हणजेच शनिवारी २९ जूनला वक्री होत आहे. शनीला ज्योतिषशास्त्रात फार महत्त्व दिलेले आहे. शनी दुपारी ११ वाजून ४० मिनिटांनी कुंभ राशीत वक्री होत आहे. शनी या स्थितीत पुढील साडेचार महिने म्हणजे १५ नोव्हेंबर २०२४पर्यंत आहे.

जेव्हा ग्रह वक्री असतो, तेव्हा तो पृथ्वीपासून जवळ असतो. त्यामुळे या ग्रहाचे परिणामही जास्त राहातात. म्हणूनच शनी किंवा दुसरा कोणताही ग्रह वक्री झाला तर त्याचे शुभ आणि अशुभ असे दोन्ही परिणाम मिळत असतात.

वक्री शनीचा या राशींना होईल लाभ

वक्री शनीचा नकारात्मक प्रभाव मेष, सिंह आणि धनू या तीन राशींना नसणार. शनी महाराज त्यांना शुभ सिद्ध होईल. या राशींना त्यांच्या कष्टाचे आणि कर्माचे योग्य फळ मिळेल.

'या' राशींवर कामाचा ताण वाढेल

मीन, कुंभ, मकर, वृश्चिक, कर्क, मिथुन, वृषभ, तूळ, कन्या या राशींना करिअरमध्ये त्रासाला तोंड द्यावे लागेल. या राशींवर कामाचा ताण वाढेल. वरिष्ठ तुमच्या कष्टाकडे दुलर्क्ष करतील, त्यामुळे तुम्हाला नोकरी बदलावी असे वाटेल. याचा तुमच्या करिअरवर प्रभाव पडेल.

काही नोकरदार व्यक्तींची बदली होईल, त्यामुळे ते नाराज असतील. त्यामुळे नोकदार व्यक्तींना मानसिक त्रास होईल. त्यामुळे ते योग्य निर्णय घेऊ शकणार नाहीत. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठाही कमी झालेली दिसून येईल.

SCROLL FOR NEXT