Belly button Astrology
माणसाचा चेहरा आणि डोळे त्याचे व्यक्तिमत्व दर्शवतात असे आपण नेहमी ऐकतो. मात्र, ज्योतिषशास्त्रातील 'सामुद्रिक शास्त्रा'नुसार, मानवी शरीराची ठेवण आणि विविध अवयवांच्या आकारावरूनही व्यक्तीच्या स्वभावाचे आणि भविष्याचे अनेक पैलू उलगडता येतात. यामध्ये नाभीच्या आकाराला विशेष महत्त्व दिले गेले आहे. नाभीची रचना पाहून समोरची व्यक्ती नेमकी कशी आहे, हे ओळखणे शक्य आहे.
ज्यांची बेंबी बाहेरच्या बाजूला थोडी फुगीर असते, अशा व्यक्ती अत्यंत भावूक असतात. त्यांचे मन निर्मळ असते आणि त्या दिसायला आकर्षक असतात. अशा व्यक्तींना नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी राहायला आवडते. ही मंडळी जिद्दी असून त्यांना हवी ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. नात्यांच्या बाबतीत हे लोक खूप प्रामाणिक असून दीर्घकाळ मैत्री किंवा साथ निभावतात.
बेंबी साधारणपणे पोटाच्या मध्यभागी असते, पण काहींची ती थोडी बाजूला आणि अंडाकृती असते. अशा व्यक्ती रोमँटिक आणि मिश्किल स्वभावाच्या असतात. मात्र, त्या तितक्याच संवेदनशीलही असतात. त्यांना एखादी गोष्ट लवकर बोर होते, त्यामुळे ते सतत नवनवीन गोष्टींच्या शोधात असतात.
ज्यांची नाभी खोल आणि आकाराने मोठी असते, अशा व्यक्ती मोठ्या मनाच्या असतात. इतरांना मदत करण्यासाठी त्या नेहमी तत्पर असतात. या लोकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे, आपल्या मनातील दुःख ते कोणाकडेही व्यक्त करत नाहीत; कितीही मोठे संकट आले तरी ते स्वतःच्या हिमतीवर पचवतात.
लांब आणि वक्राकार नाभी असलेल्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास ठासून भरलेला असतो. ही मंडळी जे काम हातात घेतात, ते मनापासून पूर्ण करतात. त्यांना नवीन मित्र बनवायला आवडते, पण ते कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाहीत. आपल्या भावनांवर त्यांचे कमालीचे नियंत्रण असते.
ज्यांची नाभी खाली झुकलेली असते अशा व्यक्तींमध्ये ऊर्जेची कमतरता दिसू शकते. कामाबाबत ते फार उत्साही नसतात. तरीही जे काम हाती घेतात ते पूर्ण आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण करतात. स्वभावाने ते थोडे आळशी असले तरी त्यांची बुद्धी खूप तीक्ष्ण असते. त्यामुळे आयुष्यात ते आपले जीवन व्यवस्थित घडवू शकतात.
ज्यांची नाभी पोटाच्या दोन्ही बाजूंना रुंद पसरलेली असते अशा व्यक्ती सहजपणे कोणावरही विश्वास ठेवत नाहीत. त्या नेहमी संभाव्य अडचणींबाबत सतर्क असतात आणि वेळेत त्यावर उपाय शोधतात. अशा लोकांना पोलीस, वकील किंवा प्रशासनासारख्या क्षेत्रात यश मिळू शकते. आपल्या जवळच्या लोकांची त्या खूप काळजी घेतात.