Money Plant Turning Yellow pudhari
ज्योतिष आणि धार्मिक

Money Plant Vastu Tips: घरातील मनी प्लांट पिवळं पडलंय... काय आहेत वास्तुशास्त्राचे संकेत, पाने सतत हिरवी गार कशी ठेवायची?

मनी प्लांट अर्थात झेड प्लांट पिवळे पडू नये म्हणून त्याची काळजी कशी घ्यायची?

Anirudha Sankpal

Money Plant Turning Yellow Vastu Shastra: घरात पॉझिटिव्ह एनर्जी रहावी यासाठी आपण वेगवेगळी झाडे लावत असतो. वास्तू शास्त्र आणि फेंगशुई मान्यतेनुसार झेड प्लांट अर्थात मनी प्लांट हे सकारात्मक उर्जेच्या बाबतीत अत्यंत शक्तीशाली आणि शुभ मानलं गेलं आहे. मान्यतेनुसार हे झाड जर घरात असेल तर घरात सुख शांती आणि धन संपत्ती आकर्षित होते.

मात्र, या झाडाची चांगली काळजी घेऊन किंवा थोडं दुर्लक्ष झाल्यावर झेड प्लांट अर्थात मनी प्लांटची हिरवी पाने पिवळी पडू लागतात. वास्तू शास्त्रानुसार मनी प्लांटची पाने पिवळी पडणे हे फक्त झाडाच्या आरोग्याशी संबंधित नाही तर याचा परिणाम आयुष्यावर देखील होऊ शकतो.

पैशाचे नुकसान

झेड प्लांटला लोक मनी प्लांट देखील म्हणतात. हे झाल पैसा आकर्षित करतं अशी धारणा आहे. त्यामुळं या झाडाची पाने पिवळी होऊ लागली किंवा झाड सुकू लागलं तर याचा परिणाम आर्थिक स्थितीवर होतो. स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर झेड प्लांड (मनी प्लांट) पिवळे पडू लागले तर हा पैशाच्या बाबतीत अडचणी निर्माण होऊ शकतो असा संकेत मानला जातो. येणाऱ्या काळात वाफळ खर्च वाढणे, किंवा येणारा पैसा न टिकणे अशी गोष्टी होऊ शकतात.

आरोग्याबाबत संकेत

जर घरातील पूर्व दिशेला मनी प्लांट लावलं असेल आणि त्याची पाने पिवळी होऊन गळू लागली असतील तर थोडं सावधान होण्याची गरज आहे. वास्तू शास्त्र आणि ज्योतिष शास्त्रानुसार पूर्व दिशा उत्तम आरोग्याचं आणि कौटुंबीक संतुलाचे प्रतिक आहे. या दिशेला ठेवलेले झाड अन् त्याची पाने पिवळी पडू लागली तर ते घरातील कोणत्यातरी सदस्यांची प्रकृती बिघडण्याची किंवा कारण नसताना घरात वाद निर्माण होण्याचे संकेत असतात.

मनी प्लांट कायम हिरवे ठेवण्याच्या टिप्स

  • मनी प्लांट कायम पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशाला ठेवावे.

  • जर मनी प्लांटला मुख्य दरवाज्याजवळ ठेवले तर त्याच्या जवळ साफसफाई ठेवावी. शेजारी चप्पल आणि बूट ठेऊ नये.

  • कडक उन्हापासून मनी प्लांटचा बचाव करावा. दिवसातील ३ ते ३ तासच कोवळं ऊन द्यावं.

  • ज्यावेळी वरची माती कोरडी असेल त्यावेळी त्या झाडाला पाणी घाला.

  • जी पाने पूर्णपणे पिवळी झाली आहेत किंवा खराब झाली आहे. त्यांना हळूच कापून टाकावे. तिथं नवीन हिरवी पाने येतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT