Budh Gochar 2026  AI-generated image
ज्योतिष आणि धार्मिक

Budh Gochar 2026 : पुढील ३२ दिवस ४ राशींवर होणार पैशांचा पाऊस! बुध गोचर बदलणार नशीब; तुमची रास आहे का?

बुध ग्रहाचे 'पुनर्वसु' नक्षत्रात गोचर करणे काही राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरण्‍याची शक्‍यता

पुढारी वृत्तसेवा

Budh Gochar 2026 : दर महिन्याला ग्रहांचे राजकुमार 'बुध' आपले स्थान बदलतात. व्यापार आणि बुद्धीचे कारक मानले जाणारे बुध ग्रहाचे गोचर आपल्यासोबत शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारचे परिणाम घेऊन येते. आजपासून बुध स्वतःच्याच मिथुन राशीत विराजमान होणार आहेत. विशेष म्हणजे, या वर्षी जुलै महिन्यात बुध ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन होणार नाहीये. सध्याच्या काळात बुध हे गुरूच्या नक्षत्रात बसले असून, या संपूर्ण महिन्यात ते याच नक्षत्रात राहतील.

बुध ग्रह करणार 'पुनर्वसु' नक्षत्रात गोचर

द्रिक पंचांगानुसार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ वाजून २३ मिनिटांनी बुधाचे नक्षत्र गोचर होईल आणि बुध गुरूच्या नक्षत्रातून निरोप घेतील. ग्रहांचे राजकुमार बुध यांनी 'पुनर्वसु' नक्षत्रात गोचर करणे काही राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. जाणून घेऊया की बुधाच्या या नक्षत्र गोचरामुळे कोणत्या राशींना नशिबाची साथ मिळणार आहे याविषयी...

बुधाचे गुरू नक्षत्रातील गोचर कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरेल?

पुनर्वसु नक्षत्राचा स्वामी ग्रह 'गुरू' आहे. बुधाचे गुरूच्या पुनर्वसु नक्षत्रात गोचर करणे काही राशींसाठी अत्यंत शुभ मानले जात आहे. या काळात बुधाचे हे गोचर मेष, मकर, कन्या आणि तुला राशीच्या जातकांसाठी प्रचंड लाभ घेऊन येणारे ठरेल.

कन्‍या राशींच्‍या जातकांसाठी अत्‍यंत शुभ काळ

बुधाचे पुनर्वसु नक्षत्रात गोचर करणे कन्या राशीसाठी अत्यंत शुभ मानले जात आहे. या काळात तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तसेच, काही लोक शैक्षणिक सहलीला (Educational Trip) देखील जाऊ शकतात.

मेष राशीच्‍या जातकांना आर्थिक लाभ

मेष राशीच्या लोकांसाठी बुधाचे पुनर्वसु नक्षत्रातील गोचर लाभदायक ठरेल. बँक बॅलन्स वाढवण्यासाठी तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. तुमचा आत्मविश्वास कमालीचा वाढेल. विशेषतः संवाद किंवा कम्युनिकेशन क्षेत्राशी जोडलेल्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहील.

मकर राशीच्‍या जातकांच्‍या प्रेम जीवनात येईल बहार

मकर राशीसाठी बुधाचे हे गोचर फायदेशीर मानले जात आहे. या काळात तुमचे मन धार्मिक कार्यात अधिक रमेल. त्याचसोबत तुमची लव्ह लाईफ (प्रेम जीवन) देखील अतिशय सुंदर आणि आनंदी असणार आहे.

तूळ राशीच्‍या जातकांच्‍या आर्थिक समस्‍या होतील कमी

बुधाचे पुनर्वसु नक्षत्रातील गोचर तुला राशीसाठी सकारात्मक राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेषतः खूप शुभ मानला जात आहे. याशिवाय, पैशांशी संबंधित असलेल्या तुमच्या सर्व अडचणी या काळात कमी होऊ शकतात.

टीप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT