ज्योतिष आणि धार्मिक

Mars transit 2026| कुंभ राशीत मंगळ-शुक्राची युती; 'धनशक्ती राजयोग' पालटणार 'या' राशींचे नशीब!

२३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ०७:२७ वाजता मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल

पुढारी वृत्तसेवा

Mars-Venus Conjunction in Aquarius 2026

नवी दिल्ली : ज्योतिष शास्त्रानुसार, यंदा कुंभ राशीत अनेक महत्त्वाच्या ग्रहांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. सध्या कुंभ राशीत धनदाता शुक्र आणि बुद्धीचा देवता बुध विराजमान आहेत. मात्र, लवकरच ग्रहांचा सेनापती मानला जाणारा 'मंगळ' या राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाच्या या गोचरामुळे कुंभ राशीत शुक्र आणि मंगळाची युती होईल, ज्याचा सकारात्मक परिणाम अनेक राशींवर दिसून येईल. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ०७:२७ वाजता मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल. शनीच्या स्वामित्वाच्या या राशीत मंगळाचे आगमन होताच 'धनशक्ती राजयोग' निर्माण होणार आहे. या राजयोगामुळे कोणत्या राशींना सुवर्णकाळ लाभण्‍याची शक्‍यता आहे हे जाणून घेवूया...

मिथुन

मिथुन राशीच्‍या जातकांना मिळणणार कुटुंबातील सदस्‍यांचे सहकार्य

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत शुभ असेल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल आणि प्रेमसंबंधांत गोडवा येईल. आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी नवीन संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे बँक बॅलन्स वाढण्यास मदत होईल. मात्र, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि वादाच्या प्रसंगांपासून दूर राहणे हिताचे ठरेल.

मकर राशीच्‍या जातकांचा वाढणार आत्‍मविश्‍वास

मकर राशीच्या जातकांसाठी ही युती लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमचा कल धार्मिक कार्यांकडे अधिक असेल. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हा काळ पर्वणी मानला जात असून, शैक्षणिक सहलीचे योग जुळून येऊ शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्‍या जातकांसाठी मंगळ-शुक्र युती प्रगतीकारक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगढ-शुक्र युती प्रगतीकारक असेल. व्यापाऱ्यांसाठी हा काळ उत्तम असून व्यवसायात वृद्धी होईल. सामाजिक क्षेत्रात तुमचा जनसंपर्क वाढेल. व्यावसायिक आयुष्यात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. मित्रांच्या मदतीने तुम्ही कठीण प्रसंगांवर सहज मात करू शकाल.

कुंभ

कुंभ राशीच्‍या जातकांना होणार विशेष लाभ

स्वतः कुंभ राशीतच ही युती होत असल्याने या राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष फायदेशीर ठरेल. तुम्ही प्रत्येक काम पूर्ण आत्मविश्वासाने पूर्ण कराल. व्यापाऱ्यांच्या कामाचे कौतुक होईल आणि एखादी मोठी फायदेशीर डील हाती लागू शकते. समाजात मान-सन्मान आणि पद-प्रतिष्ठेत वाढ होईल. प्रकृती उत्तम राहील, फक्त भरपूर पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT