Mars in Taurus
मंगळ गोचर, मंगळ - गुरू युती कधी आहे?  File Photo
ज्योतिष आणि धार्मिक

मंगळ गोचर, मंगळ - गुरू युती कधी आहे?

चिराग दारुवाला

मंगळ ग्रह शौर्य, नेतृत्त्व युद्ध यांचा कारक ग्रह मानला जातो. हा ग्रह १२ जुलैला वृषभ राशीत गोचर करत आहेत. तर वृषभ राशीत आधीपासूनच देवगुरू गुरू ग्रह विराजमान आहे. त्यामुळे वृषभ राशीत गुरू आणि मंगळ युती होणार आहे. मंगळ वृषभ राशीत ४६ दिवस असेल, त्यानंतर २६ ऑगस्ट तो मिथुन राशीत प्रवेश करत आहे. मंगळ ग्रह हा मेष आणि वृश्चिकचा राशिस्वामी आहे. जेव्हा हा ग्रह गोचर करतो, तेव्हा त्याचे परिणाम व्यक्तींबरोबर देश आणि जगाच्या आर्थिक स्थितीवर होतात. आज आपण जाणून घेऊ मंगळ गोचरचा कोणत्या राशींना शुभ लाभ मिळतील. Mars in Taurus

मेष - नोकरदार आणि व्यापाऱ्यांना लाभ

मंगळ गोचर, मंगळ - गुरू युती कधी आहे?

मेष राशीसाठी हे गोचर दुसऱ्या स्थानी होत आहे. या काळात तुम्हाला आराम मिळेल आणि मौजमजेत वेळ घालवला. धार्मिक आणि आध्यात्मिक बाबतीत तुमचा कल वाढेल, तुम्ही धार्मिक स्थळांच्या प्रवासाला जाऊ शकता. या काळात नोकरदार आणि व्यापाऱ्यांना लाभाच्या संधी मिळतील आणि तुम्हाला कामातून समाधानही मिळेल. जोडीदार आणि कुटुंबीयांसोबत तुमचे नाते चांगले राहील आणि प्रकृतीतही सुधारणा होईल.

वृषभ 

मंगळ गोचर, मंगळ - गुरू युती कधी आहे?

मंगळ ग्रह तुमच्या राशीत पहिल्या म्हणजे लग्न स्थानी गोचर करत आहे. कामाच्या ठिकाणी किंवा व्यापारात तुम्हाला अडथळे येत असतील तर ते दूर होतील. तुम्ही नफा मिळवण्यासाठी नव्य रणनीतीवर काम कराल. अडकलेली पैसे हाती येतील. सासरच्या बाजूच्या नातेवाईकांसोबत संबंध चांगले राहतील. तसेच तुम्हाला प्रत्येक बाबतीत जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. तुम्ही एकमेकांच्या भावनांचा आदर कराल. Mars in Taurus

सिंह - धार्मिक कार्यात रस वाढेल

मंगळ गोचर, मंगळ - गुरू युती कधी आहे?

मंगळ ग्रह तुमच्या राशीत १० व्या स्थानी गोचर करत आहे. या काळात सिंह राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती बळकट होईल आणि तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकाल. करिअरमध्ये नोकरदारांसाठी सुवर्ण काळ असेल, तुम्हाला अनेक कंपन्यांतून नोकरीचे प्रस्ताव येतील. या काळात वाहन, संपत्ती खरेदीची इच्छा पूर्ण होईल. उत्पन्नाच्या बाबतीत नशिबवान असाल. कुटुंबिक तसेच वैवाहिक जीवनातील जबाबदाऱ्या पार पाडाल. धार्मिक कार्यात रस वाढेल.

कन्या - घरी मंगलकार्याचे आयोजन होईल

मंगळ गोचर, मंगळ - गुरू युती कधी आहे?

मंगळ तुमच्या राशीला ९ व्या स्थानी गोचर करत आहे. तुम्हाला परदेशात संधी मिळतील आणि जीवनातील प्रत्येक बाबतीत यशस्वी व्हाल. नोकरदार आणि व्यवसायिक यांना चांगले लाभ मिळतील आणि करिअरमध्ये नव्या उंचीवर पोहोचतील. जर कुटुंबात काही वाद सुरू असतील तर ते या काळात संपतील, तसेच घरी मंगलकार्याचे आयोजन होईल. अडकलेले पैसे हाती येतील आणि जीवनशैलीत सुधारणा होईल.

तूळ - मानसन्मान, प्रतिष्ठा वाढेल

मंगळ गोचर, मंगळ - गुरू युती कधी आहे?

मंगळ तुमच्या राशीत आठव्या स्थानी गोचर करत आहे. या काळात तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात विविध संधी मिळतील, तसेच तुम्ही विविध मार्गातून पैसे मिळवाल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, आणि सर्व प्रलंबित कामे मार्गी लागतील. नोकरदारांचा पराग वाढेल तर व्यापाऱ्यांना आर्थिक लाभ होतील. मंगळच्या प्रभावमुळे नेतृत्त्व गुणात होईल वाढ, मानसन्मान, प्रतिष्ठा वाढेल. जोडीदारासोबतचे तुमचे संबंध आनंदी राहतील.

धनू - इतर व्यवसायात गुंतवणूक कराल

मंगळ गोचर, मंगळ - गुरू युती कधी आहे?

मंगळ तुमच्या राशीत सहाव्या स्थानी गोचर करत आहेत. या काळात धनू राशीचे लोक चांगले मित्र जोडतील आणि भावाबहिणींचे सहकार्य लाभेल. नोकरदार व्यक्तींना लाभ मिळतील आणि तुम्ही नवे पद मिळवू शकाल. धनसंचय करू शकाल, आणि तुमचे धैर्य वाढेल. त्यामुळे तुमची निर्णयक्षमता ही विकसित होईल. व्यापाऱ्यांना चांगले लाभ मिळतील. तसेच इतर व्यवसायांत गुंतवणूक करू शकाल. Mars in Taurus

SCROLL FOR NEXT