पुढारी वृत्तसेवा :
आज महाशिवरात्रीचा सण संपूर्ण देशभर मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा होत आहे. देशभरातील शिवालये, मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या दिवशी शिवलिंगावर शिवभक्तांनी काही वस्तू अवश्य अर्पण करायला हव्या, ज्यामुळे देवांचे देव महादेव नक्कीच प्रसन्न होतील, अशी भाविकांची श्रद्धा आहे. (Mahashivratri 2025)
आज २६ फेब्रुवारी सर्वत्र महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. हा दिवस भगवान शंकर आणि पार्वती यांच्यासाठी खूप खास आहे असे म्हटले जाते. या दिवशी खास करून शिवभक्त व्रत, पूजा करून भगवान शिवाला प्रसन्न करण्याचा मनोभावे प्रयत्न करतात. भगवान शंकराला शास्त्रांमध्ये औघड दानी म्हटले आहे. ज्याचा अर्थ भगवान शंकर प्रसन्न झाल्यावर आपल्या भक्ताला कोणतेही इच्छीत वर देऊ शकतात. अशावेळी आज जर शिवभक्तांनी काही खास गोष्टी महादेवाला अर्पण करून महादेवाला प्रसन्न केले शकता अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हिंदू पंचांगानुसार महाशिवरात्री या वर्षी २६ फेब्रुवारी सकाळी ११:०८ पासून २७ फेब्रुवारी सकाळी ८:५४ वाजेपर्यंत आहे. मात्र हिंदू धर्मात प्रदोष काळात महादेवाची पूजा करण्याचे विधान आहे, त्यामुळे २६ फेब्रुवारीलाच महाशिवरात्री होत आहे.
दही
गायीचे तूप
कच्चे दूध
पांढरे फूल
फळ
अक्षता
बेलपत्र
धोतरा
भांग
मध
गंगाजल
भस्म
काळे तीळ
हिरवी मुग डाळ
शमी पत्र
पांढरे आक फूल (मदार)
बोर
बेल
अत्तर
पांढरे चंदन
कच्चा धागा
पान
सुपारी