Mahashivratri file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला राशीनुसार शिवलिंगाला कोणता अभिषेक करावा?

महाशिवरात्रीला जो कोणी विधीवत व्रत आणि भगवान शंकराची पूजा करतो, त्याला वर्षभरातील सर्व शिवरात्रींचे पुण्य फळ प्राप्त होऊ शकते.

पुढारी वृत्तसेवा

Mahashivratri 2026:

महाशिवरात्रीला महादेवाची पूजा आणि व्रत करण्याला विशेष महत्त्व असते. शिवपुराणानुसार, जो कोणी या दिवशी विधीवत व्रत आणि भगवान शंकराची पूजा करतो, त्याला वर्षभरातील सर्व शिवरात्रींचे पुण्य फळ प्राप्त होऊ शकते. यावर्षी महाशिवरात्रीचे व्रत १५ फेब्रुवारी, रविवार रोजी केले जाईल. या दिवशी शिवपूजेसोबतच अभिषेकाचेही विशेष महत्त्व आहे. मनोभावे अभिषेक केल्याने जन्मोन्जन्माच्या पापांतून मुक्ती मिळू शकते, अशी मान्यता आहे.

मेष

मेष

मेष राशीच्या व्यक्तींनी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे ध्यान करत भगवान शंकराची पूजा करावी. शिवलिंगाचा दूध आणि गुळाने अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे भोलेनाथांची विशेष कृपा लाभू शकते.

वृषभ

वृषभ

वृषभ राशीने मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे ध्यान करावे. शिवलिंगावर दूध अर्पण करून केशराचा लेप लावावा. असे केल्याने मोठे पुण्यफळ प्राप्त होते.

मिथुन

मिथुन

मिथुन राशीच्या जातकांनी महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे ध्यान करावे. शिवलिंगाचा मधाने अभिषेक करावा. तसेच ११ किंवा २१ बेलपत्रांवर ‘ॐ नमः शिवाय’ लिहून अर्पण करावे. जीवनातील अडथळे दूर होतात.

कर्क

कर्क

कर्क राशीने ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे ध्यान करावे. गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून १०८ अखंड तांदूळ अर्पण करावेत आणि ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप करावा.

सिंह

सिंह

सिंह राशीच्या जातकांनी केदारनाथाचे ध्यान करत पूजा करावी. दह्यानेही अभिषेक करू शकता.

कन्या

कन्या

कन्या राशीने भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे ध्यान करावे. दूधाने अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे जीवनात सुख-समृद्धी येते.

तूळ

तूळ

तुला राशीच्या व्यक्तींनी काशी विश्वनाथाचे ध्यान करावे. दह्याने अभिषेक करून मध अर्पण करावा. शिवकृपा प्राप्त होते.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक राशीने त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे ध्यान करावे. याव्यतिरिक्त, महाशिवरात्रीला गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने भगवान शिवाचा अभिषेक करावा.

धनु

धनु

धनु राशीच्या जातकांनी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे ध्यान करावे. पाणी आणि तुपाने अभिषेक करणे शुभ मानले जाते.

मकर

मकर

मकर राशीने नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे ध्यान करावे. मधाने अभिषेक करून ‘रुद्राष्टक’चा पाठ करावा. जीवनात आनंद आणि समृद्धी टिकून राहते.

कुंभ

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींनी रामेश्वरम ज्योतिर्लिंगाचे ध्यान करावे. तूप आणि गंगाजलाने अभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.

मीन

मीन

मीन राशीने घुश्मेश्वर ज्योतिर्लिंगाचे ध्यान करावे. तूप आणि गंगाजलाने अभिषेक करून ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप करत १०८ अखंड अक्षता अर्पण कराव्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT