Siddhidatri Pudhari
ज्योतिष आणि धार्मिक

Maa Siddhidatri: नवरात्रीचा नववा दिवस: देवी सिद्धिदात्रीची महती, पूजा आणि आठ सिद्धींचे महत्त्व

नवदुर्गांमधील अंतिम स्वरूप असलेल्या सिद्धिदात्री देवीची उपासना केल्याने सुख, समृद्धी आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो, अशी धार्मिक मान्यता आहे

पुढारी वृत्तसेवा

वन्दे वांछित मनोरथार्थ चन्द्रार्धकृत शेखराम्।

कमलस्थितां चतुर्भुजा सिद्धीदात्री यशस्वनीम् ॥

दुर्गामातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धिदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी आहे. दुर्गापूजेच्या नवव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी शाखोक्त विधी पूर्ण निष्ठेने करणाऱ्या साधकांना सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते.

ब्रह्मांडावर पूर्ण विजय मिळविण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येते. अणिमा, महिमा, गरिमा, लधिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी मार्कण्डेय पुराणात सांगितल्या आहेत. देवी सिद्धिदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे.

भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. यामुळेच शिवाचे अर्धे शरीर देवीसारखे आले होते. या कारणामुळे त्यांना लोक 'अर्धनारीनटेश्वर' या नावाने ओळखतात. देवी सिद्धिदात्री चार भुजाधारी आहे. तिचे वाहन सिंह आहे.

ती कमळाच्या फुलावरही विराजमान होऊ शकते. तिच्या उजव्या बाजूकडील खालच्या हातात कमळाचे फूल आहे. देवी सिद्धिदात्रीची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने निरंतर प्रयत्न केले पूर्ण होतात. पाहिजेत.

तिच्या कृपेने अनेक दुःख दूर करून तो सुखाचा उपभोग घेऊ शकतो. त्यामधून त्याला मोक्षाचा मार्गही मिळतो. नवदुर्गामध्ये देवी सिद्धिदात्री शेवटची देवी आहे. या देवीची उपासना पूर्ण केल्यानंतर साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT