Maa Chandraghanta Pudhari
ज्योतिष आणि धार्मिक

Maa Chandraghanta: माँ चंद्रघंटा देवीचे स्वरूप कसे आहे? नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी जाणून घ्या महत्त्व आणि पूजेचे महत्त्व

दहा हातांत अस्त्रे, मस्तकावर अर्धचंद्र आणि वाहन सिंह; माँ चंद्रघंटा देवीची उपासना धैर्य, शौर्य आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानली जाते.

पुढारी वृत्तसेवा

दुर्गेच्या तिसऱ्या शक्तीचे नाव 'चंद्रघंटा' आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. तसेच संकट निवारणासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'मणिपूर' चक्रात प्रविष्ट होते. चंद्रघंटेच्या कृपेने अलौकिक वस्तूचे दर्शन होते.

दिव्य सुगंधाचा अनुभव येतो किंवा विविध प्रकारचा दिव्य आवाज ऐकायला येतो. हे क्षण साधकासाठी अत्यंत सावधान राहण्यासाठी असतात. देवीचे हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे. तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला 'चंद्रघंटादेवी' असे म्हटले जाते.

शरी- राचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे. या देवीला दहा हात आहेत. या दहा हातांमध्ये खड़ा, धनुष्यवाण आदी शखे आहेत. तिचे वाहन सिंह असून, मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते. माँ 'चंद्राघंटा'च्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर केले जाते. माँ भक्तांच्या संकटाचे निवारण लगेच करते. तिचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो.

तिच्या घंटेचा आवाज प्रेतबाधेपासून भक्तांचे रक्षण करतो. या देवीच्या चरणी शरणागती पत्करल्यास घंटेचा आवाज निनादतो. या माँदेवीचे रूप अत्यंत सौम्य व शांतीपूर्ण आहे. या देवीची आराधना केल्यास वीरता निर्भयतेबरोबर सौम्यतेचा विकास होऊन संपूर्ण शरीरात कांती-गुणांची वाढ होते. आवाजात मधुरता येते.

माँ 'चंद्राघंटा'चे भक्त आणि उपासक जेथे जातात तेथील लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात. आपण आपले मन, वचन, कर्म हे पवित्र करून देवीची उपासना करण्यासाठी तयार व्हा. तिची उपासना केल्यामुळे सर्व सांसारिक संकटातून मुक्ती मिळते, आपण नेहमी तिची उपासना करण्यासाठी अग्रेसर असावे. इहलोक आणि परलोक दोन्हींच्या कल्याणकारी आणि समृद्धी साठी तिचे लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT