आजचे राशिभविष्य, जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? File Photo
ज्योतिष आणि धार्मिक

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | मंगळवार, ९ जुलै २०२४

आजचे राशिभविष्य : मंगळवार, ९ जुलै २०२४

चिराग दारुवाला

चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर

मेष : कामे पूर्ण करण्यासाठी जवळच्या मित्राचा सल्ला उपयुक्त

मेष

मेष : आज तुमचे विशेष कामे पूर्ण करण्यासाठी जवळच्या मित्राचा सल्ला उपयुक्त ठरेल. सामाजिक संस्थेत तुमचे विशेष योगदान असेल. उधार दिलेले पैसे परत मिळाल्‍याने आर्थिक स्‍थिती सुधारेल. शेजाऱ्यांशी वाद टाळा अन्‍यथा तुमच्‍या कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. विद्यार्थी अभ्यासात दुर्लक्ष करतील. खर्चावर नियंत्रण ठेवा, अशी सूचना श्रीगणेश करतात. कुटुंबातील सदस्‍यांमध्‍ये योग्य समन्वय राहील. महिला आरोग्याची विशेष काळजी घेतील.

वृषभ : प्रतिष्ठित व्यक्तीसोबत झालेली भेट तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल

वृषभ

वृषभ : आज प्रतिष्ठित व्यक्तीसोबत झालेली भेट तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान तुम्हाला आनंद देऊ शकते. आळशीपणात वेळ वाया घालवू नका. कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते टाळणे चांगले, असा सल्ला श्रीगणेश देतात. व्यावसायिक कामे पूर्वीपेक्षा चांगली होतील. कौटुंबिक व्यवस्था व्यवस्थित राहील. आरोग्य चांगले रहिल.

मिथुन : आज नियोजन सुरू करण्यापूर्वी दोनदा विचार करा

मिथुन

मिथुन : श्रीगणेश म्‍हणतात की, आज कोणतेही नियोजन सुरू करण्यापूर्वी दोनदा विचार करा. प्रारब्धाऐवजी कर्मावर विश्वास ठेवा. जवळच्या नातेवाईकाशी सौम्य वाद होऊ शकतो. हुशारीने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. समस्या सोडवण्यासाठी जोडीदाराचे पूर्ण सहकार्य असेल. पोटविकाराचा त्रास होण्‍याची शक्‍यता.

कर्क : दिवसाची सुरुवात अनुकूल असेल

कर्क

कर्क : दिवसाची सुरुवात अनुकूल असेल. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. त्यामुळे समर्पणाने कार्य करा. विद्यार्थ्यांनी अभ्यासात बेफिकीर राहणे योग्‍य ठरणार नाही. एखादी महत्त्वाची गोष्ट गमावण्याची किंवा विसरण्याची चिंता असेल. हट्टी वर्तन संबंध खराब करू शकतात याची जाणीव ठेवा. पती-पत्नीचे नाते मधूर होईल. आरोग्य उत्तम राहल, असे श्रीगणेश सांगतात.

सिंह : जवळच्या नात्यातील गैरसमजामुळे संबंध बिघडू शकतात

सिंह

सिंह : श्रीगणेश म्‍हणतात की, दिवस थोडासा सामान्य जाईल. तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे काम करू शकाल. कौटुंबिक समस्या सोडविण्यासही मदत करू शकता. तुमच्या योग्यतेची लोकांना खात्री पटेल. जवळच्या नात्यातील गैरसमजामुळे संबंध बिघडू शकतात. व्यावसायिक कामे पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. तब्येतीत काही कमजोरी असू शकते.

कन्या : कुटुंबातील ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभतील

कन्या

कन्या : श्रीगणेश सांगतात की, आज अध्यात्माशी संबंधित कोणतीही विशेष गोष्ट सखोलपणे जाणून घेण्यात रस असेल. कुटुंबातील ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभतील. प्रवास टाळणे योग्य ठरेल. कौटुंबिक समस्या समन्वयातून सोडवण्याचा प्रयत्न करा. एखादे काम अचानक थांबल्याने मन अस्वस्थ होऊ शकते. व्यवसायात सध्या कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. प्रेमसंबंधांचे विवाहात रुपांतर करण्यासाठी कुटुंबात चर्चा होऊ शकते. आरोग्य चांगले राहिल.

तूळ : आजचा दिवस व्यस्ततेने भरलेला असेल

तूळ

तूळ : आजचा दिवस व्यस्ततेने भरलेला असेल. गुंतवणूक सुरू करण्यासाठी चांगली वेळ आहे. घरातील नियमांचे पालन केल्यानेही घरात सकारात्मकता येईल. रागावर नियंत्रण ठेवा अन्‍यथा नुकसान संभवते. प्रतिकूल परिस्थितीतही आत्मविश्वास कायम ठेवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. घरातील वातावरण प्रसन्न राहिल. आरोग्याच्या किरकोळ समस्या जाणवतील.

वृश्चिक : कुटुंबात सुव्यवस्था राखण्यात यश मिळेल

वृश्चिक

वृश्चिक : श्रीगणेश म्हणतात की, आज उपयुक्त माहिती मिळू शकते. कुटुंबात सुव्यवस्था राखण्यात यश मिळेल. मुलांच्या योग्य वागणुकीमुळे मनशांती लाभेल. एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना गोंधळ होऊ शकतो. सकारात्मक कार्यात थोडा वेळ घालवा. कोणत्याही व्यवसायातील गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल नाही. पती-पत्नीमधील नाते मधूर होईल. अतिकामामुळे थकवा जाणवेल.

धनु : गरजू आणि वडिलधाऱ्यांची काळजी घ्‍याल

धनु

धनु : श्रीगणेश सांगतात की, तुमची उर्जा सकारात्मक दिशेने लावल्यास शुभ परिणाम मिळतील. गरजू आणि वडिलधाऱ्यांची काळजी घ्‍याल. मनात नकारात्मक विचार येऊ देवू नका. जोडीदाराच्या आरोग्याची चिंता राहू शकते. आरोग्य चांगले राहू शकते.

मकर : योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने तुमचे नशीब मजबूत होईल

मकर

मकर : घरातील काही महत्त्वाची कामे करताना इतर सदस्यांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या, असे श्रीगणेश सांगतात. सामाजिक संस्थांमध्ये तुमचे भरीव योगदान असेल. अचानक काही अडकलेली कामे पूर्ण होतील. मुलांच्या हालचालींवरही लक्ष ठेवा. दुपारनंर परिस्थिती थोडी प्रतिकूल असू शकते.संयमाने काम करा. व्यवसायिक कामे सामान्य राहतील. अशक्तपणाचा त्रास जाणवेल.

कुंभ : धन व्यर्थ खर्च करू नका

कुंभ

कुंभ : श्रीगणेश म्‍हणतात की, योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने तुमचे नशीब मजबूत होईल. अडकलेले पैसे परत मिळाल्‍याने आर्थिक स्थिती सुधारेल. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. घरात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा.कौटुंबिक वातावरण आनंदमय राहिल. सर्दी, ताप इत्यादी हंगामी आजारांचा त्रास होवू शकतो.

मीन : जोडीदाराच्या सहकार्याने अनेक समस्या दूर होतील

मीन

मीन : आज कठीण प्रसंगी राजकीय मदत मिळू शकते. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्‍या, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. फोनद्वारे काही महत्त्वाची बातमी मिळेल. प्रिय मित्राशी संभाषण होईल.कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यवसायात काही व्यत्यय येऊ शकतो. सध्याची परिस्थिती पाहता संयम राखणे शहाणपणाचे ठरेल. जोडीदाराच्या सहकार्याने अनेक समस्या दूर होतील. आहार घेताना काळजी घ्‍या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT