आपल्यापैकी काही जणांकडे धूर्तपणा, कावेबाजपणा, मुत्सद्दीपणा अधिक असतो. आपणाकडे काहीतरी गुप्त ठेवण्याची वृत्ती असते. आपल्या स्वभावात मनमोकळेपणाचा अभाव असतो. आपले बोलणे मार्मिक असते. स्वत:च्या फायद्याकडे आपले अधिक लक्ष असते. आपणापैकी अनेकांना इतरांना मार्गदर्शन करणे आवडते. संग्रह करण्याचा आपला स्वभाव आहे. आपणाकडे महत्त्वाकांक्षेचा अभाव असतो. आपल्या राशीत कोमलपणा, विनयशीलता, नम्रता, संकोच, भावनावशता ही वैशिष्ट्ये असतात.
कन्या राशीच्या व्यक्तींना संपूर्ण वर्षभर गुरू अनुकूल असल्यामुळे आरोग्य बर्याच अंशी चांगले असणार आहे.
आरोग्य द़ृष्टीने चांगले कालखंड
दि. 28/01/2025 ते दि. 29/08/2025
दि. 15/09/2025 ते दि. 22/11/2025
दि. 06/12/2025 ते दि. 29/12/2025
व्यवसाय, उद्योग, आर्थिक लाभ, उद्योगधंदा या द़ृष्टीने हे वर्ष कन्या राशीच्या व्यक्तींना अत्यंत चांगले ठरणार आहे. विशेषत: ज्वेलर्स, सोने, कापड, प्रॉपर्टी, जागा, जमिनी, बिल्डर्स, डेव्हलपर्स व कॉन्ट्रॅक्टर्स, सप्लायर्स व वाहने, गुंतवणूक या क्षेत्रातील व्यक्तींना तसेच सर्व्हिस सेंटर, ऑटोमोबाईल्स, खाद्यपदार्थ, हॉटेल, रेस्टॉरंट, साखर या व्यावसायिकांना हे वर्ष अत्यंत चांगले जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्तींना तसेच वाहन व्यवसाय व सर्व्हिस स्टेशन, ट्रान्स्पोर्ट या क्षेत्रातील व्यक्तींना हे वर्ष अत्यंत चांगले आहे. बाजारपेठेचा अभ्यास करून व चौफेर विचार करून या वर्षी शेअर्समध्ये, प्रॉपर्टीच्या व वाहनांच्या क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. भागीदारी व्यवसायातील व्यक्तींनाही हे वर्ष बरे आहे. या वर्षात तुम्हाला अनेक नवनवीन संधी प्राप्त होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन बाजारपेठ उपलब्ध होईल. दि. 14/05/2025 ते दि. 18/10/2025 या कालखंडात आपण नवीन व्यवसाय सुरू करू शकता किंवा व्यवसायाची नवीन शाखा सुरू करू शकता. आर्थिक लाभाला, प्रॉपर्टी घेण्याला व गुंतवणुकीला हा काळ चांगला आहे. दि. 01/04/2025 नंतर काही व्यवहार विलंबाने होतील.
आर्थिक लाभाच्या द़ृष्टीने चांगला कालखंड
दि. 22/01/2025 ते दि. 30/05/2025
दि. 02/07/2025 ते दि. 14/09/2025
दि. 02/11/2025 ते दि. 20/12/2025
नोकरीतील व्यक्तींना हे वर्ष विशेष समाधानाचे, यशाचे जाणार आहे. संपूर्ण वर्षभर कन्या राशीच्या व्यक्तींना नोकरीत समाधानाचे वातावरण लाभणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. फार मोठी उलथापालथ यावर्षी नाही. जे होणार आहे ते होकारात्मक असेल, सकारात्मक असेल, लाभदायक असेल. तेव्हा या वर्षी तुमचे पाऊल पुढे पडणार आहे. सर्व वर्ष गतिमानतेने वाटचाल होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमच्या अनुभवाचे, विचारांचे व कार्याचे चीज होईल. कष्ट व परिश्रम कारणी लागतील. तुम्हाला काही नवीन चांगल्या संधी लाभतील. या वर्षी बढतीचे निश्चित योग आहेत. पगारवाढीचे योग आहेत. काहींना अनपेक्षितपणे बढती मिळेल. ज्यांना बदली हवी आहे, त्यांना बदली मिळेल.
नोकरीत अधिक चांगला कालखंड
दि. 28/02/2025 ते दि. 05/05/2025
दि. 24/05/2025 ते दि. 29/08/2025
दि. 15/09/2025 ते दि. 23/11/2025
दि. 01/12/2025 ते दि. 29/12/2025
प्रॉपर्टी, जागा, जमीन, प्लॉट, फ्लॅट, बंगला, वाहने खरेदी, गुंतवणूक यासाठी हे वर्ष अत्यंत चांगले आहे. ज्या कन्या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात एकदाच प्रॉपर्टी, फ्लॅट, बंगला घ्यायचा आहे, वाहन खरेदी करायचे आहे, त्यांना हे वर्ष अत्यंत यशाचे, लाभाचे व सौख्याचे आहे. अनपेक्षित संधी येईल. तुमची आर्थिक गरज भागेल व प्रॉपर्टी, वाहन खरेदी होईल. या वर्षी ती संधी चुकवू नका. अनपेक्षितरीत्या आर्थिक प्रश्न मार्गी लागणार आहेत व तुमचे प्रॉपर्टीचे व वाहनाचे स्वप्न साकार होणार आहे.
संततिसौख्य, मुला-मुलींची शाळा, कॉलेजमधील प्रवेश, त्यांचे नोकरी, व्यवसायाचे प्रश्न, मुला-मुलींचे शैक्षणिक यश या सर्व द़ृष्टीने हे वर्ष अत्यंत चांगले आहे. तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक तुमची मुले-मुली परीक्षेत यश संपादन करणार आहेत. त्यांना आवश्यक त्या ठिकाणी शिक्षणाला प्रवेश मिळेल. त्यांचे नोकरी, व्यवसायाचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. या वर्षी मुला-मुलींची प्रगती वेगाने होणार आहे. संपूर्ण वर्ष संततिसौख्याला चांगले आहे.
संततिसौख्यासाठी चांगला कालखंड
दि. 28/01/2025 ते दि. 31/05/2025
दि. 01/07/2025 ते दि. 20/12/2025
विवाहेच्छुंचे विवाह जमणे या द़ृष्टीने कन्या राशीच्या मुला-मुलींना हे संपूर्ण वर्ष चांगले आहे. त्यामुळे ज्यांचे विवाह रखडले आहेत ते विवाह या वर्षी मार्गी लागणार आहेत. शुभ कार्यासाठी हे वर्ष अत्यंत चांगले आहे. वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल.
वैवाहिक सौख्याच्या द़ृष्टीने अनुकूल कालखंड
दि. 28/01/2025 ते दि. 31/05/2025
दि. 01/07/2025 ते दि. 02/10/2025
दि. 02/11/2025 ते दि. 20/12/2025
प्रवास, परदेश प्रवास, तीर्थयात्रा, सहली या संदर्भात कन्या राशीच्या व्यक्तींना हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे. सौख्यकारक आहे. या वर्षी काहींना अनपेक्षितपणे तीर्थयात्रेचे व परदेश प्रवासाचे योग येतील. यावर्षी कन्या राशीच्या व्यक्तींनी प्रवासाचे बेत टाळू नयेत. प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास या द़ृष्टीने हे वर्ष अत्यंत चांगले आहे.
प्रवासाच्या द़ृष्टीने चांगला कालखंड
दि. 28/01/2025 ते दि. 31/05/2025
दि. 17/09/2025 ते दि. 22/11/2025
दि. 06/12/2025 ते दि. 29/12/2025
सुसंधी, प्रसिद्धी, अंगिकृत कार्यात यश, कला, साहित्य, संगीत, नाट्य, लेखन, प्रकाशन, अभिनय, प्रसारमाध्यमे, वृत्तपत्र, कायदा, विमा या क्षेत्रातील व्यक्तींना हे वर्ष कन्या राशीच्या व्यक्तींना अभूतपूर्व अशी संधी मिळवून देणारा आहे. अनेक वर्षांतून अशी संधी कन्या राशीच्या व्यक्तींना प्राप्त झाली आहे. लेखन, प्रकाशन, साहित्य, शिक्षण, सहकार, कला, संगीत, नाट्य, अभिनय, प्रसारमाध्यमे, वृत्तपत्र, टुरिझम व तुमचे जे कार्यक्षेत्र असेल त्यामध्ये तुम्हाला अपूर्व संधी प्राप्त होणार आहे. यावर्षी आपल्या क्षेत्रात संधी मिळेलच, प्रसिद्धी मिळेल व तुम्ही आपल्या क्षेत्रात एक अपूर्व उंची गाठू शकाल.
सुसंधी, प्र्रसिद्धीसाठी अनुकूल कालखंड
दि. 28/01/2025 ते दि. 30/05/2025
दि. 06/06/2025 ते दि. 29/08/2025
दि. 15/09/2025 ते दि. 20/12/2025
समाजकारण, राजकारण, सार्वजनिक जीवन, शिक्षण, सहकार, राजकारण, सांस्कृतिक क्षेत्र, सहकार, बँकिंग या सर्व क्षेत्रांमध्ये कन्या राशीच्या व्यक्तींना हे वर्ष असामान्य यशाचे व अलौकिक लाभाचे जाणार आहे. तुम्हाला तुमच्या कार्यात प्रतिष्ठा मिळेल, नावलौकिक लाभेल, कीर्ती लाभेल. मानसन्मानाचे योग येतील.
मान, प्रतिष्ठेसाठी चांगला कालखंड
दि. 28/01/2025 ते दि. 31/05/2025
दि. 15/09/2025 ते दि. 22/11/2025
दि. 06/12/2025 ते दि. 29/12/2025
सारांश : कन्या राशीच्या व्यक्तींना यावर्षी संपूर्ण वर्षभर गुरूचे भ्रमण अनुकूल आहे. ही एक अत्यंत आपल्या द़ृष्टीने अनुकूल गोष्ट आहे.