Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.
मेष : श्रीगणेश म्हणतात की, आज रखडलेले आर्थिक व्यवहार मार्गी लागल्याने दिलासा मिळेल. आपल्या विचारात लवचिक असणे महत्वाचे आहे. संशयास्पद वृत्तीने नातेसंबंध बिघडू शकते. मुलांना त्यांच्या अडचणीत मदत करा. व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. कोणत्याही समस्येत जीवनसाथीचा सल्ला घ्या; तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल.
वृषभ : आज दुपारची परिस्थिती अनुकूल राहील, असे श्रीगणेश सांगतात. दिवसाच्या सुरुवातीला कामांची रूपरेषा तयार करा. कौटुंबिक आणि सामाजिक कार्यात तुमचा वेळ चांगला जाईल. नातेवाईकाशी मतभेद होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. तुमचा कोणताही निर्णय चुकीचा ठरू शकतो, याची जाणीव ठेवा. अडचणीच्या वेळी व्यवसायात काही अडचणी आल्यास ज्येष्ठांचा आणि अनुभवी लोकांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरेल.
मिथुन : आज सामाजिक कार्यात तुमचे विशेष योगदान असेल. कौटुंबिक मतभेदावर पडदा पडेल. जवळच्या व्यक्तीकडून काही अप्रिय बातम्या मिळणे निराशाजनक असू शकते. या काळात आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ फारसा सोयीचा नाही. कोणतीही नवीन योजना सुरू करू नका, असे संकेत श्रीगणेश देतात. कौटुंबिक बाबींमध्ये हस्तक्षेप केल्याने घरातील वातावरण तणावपूर्ण रहिल.
कर्क : श्रीगणेश सांगतात की, आज जुन्या मित्रांची भेट होईल. मनोरंजनात वेळ व्यतित कराल. मदतीसाठी इतरांवर विसंबून राहण्याऐवजी स्वतःच्या कार्यक्षमतेवर अवलंबून रहा. घरातील ज्येष्ठांचा आदर राखण्याची जबाबदारी तुमची आहे. विद्यार्थी आणि तरुणांना ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागले. पैसे उधार घेऊ नका. व्यवसायात त्वरित निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. घरातील वातावरण आनंदी राहील.
सिंह : आजचा दिवस सामान्य असेल. मुलांशी संबंधित कोणत्याही समस्येवर उपाय शोधल्यास आराम मिळेल. वडिलधाऱ्यांच्या मदतीने वादग्रस्त मालमत्तेचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा. काही नवीन जबाबदारी चिंतेचे कारण बनेल. गुंतवणूक विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणाशीही वाद घालू नका. सध्या कोणतेही महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेणे अनुकूल नाही, असे श्रीगणेश सांगतात
कन्या : आज बहुतेक कामे व्यवस्थित सुरू राहतील. कौटुंबिक सुख-सुविधांच्या खरेदीवर खर्च कराल. पैशाचे व्यवहार किंवा कर्ज घेण्याच्या कामांपासून दूर राहा. संवाद साधताना योग्य शब्दांची निवड करा, असे श्रीगणेश सांगतात. सध्या निर्णय घेण्यात काही अडचण येऊ शकते. व्यवसायातील सध्याची कामे मंद राहतील.
तूळ : श्रीगणेश म्हणतात की, आज धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात थोडा वेळ घालवल्यास मनःशांती मिळेल. मुलांच्या समस्येवर उपाय मिळाल्याने दिलासा मिळेल. आळस टाळा. तुमची कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला निर्णय घेण्यात अडचण येत असेल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यवसायाकडे यावेळी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंबासोबतही थोडा वेळ व्यतित करा. आरोग्य चांगले राहिल.
वृश्चिक : श्रीगणेश सांगतात की, आज प्रभावशाली व्यक्तीची झालेली भेट फायदेशीर ठरेल. तुमची एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण कराल. कोणतेही सरकारी काम रखडले असेल तर त्याकडे लक्ष द्या. भावनिक होऊन तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ शकता. व्यावहारिक विचार करा भावनिक होवून कोणताही निर्णय घेवू नका. माध्यमांशी संबंधित व्यवसायातयश मिळू शकते. पती-पत्नीचे नाते मधूर राहिल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर वाटेल.
धनु : आज मनाप्रमाणे यश मिळाल्याने उत्साह कायम राहील. तुम्हाला योग्य आणि महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेता येतील, असे श्रीगणेश सांगतात. सकारात्मकता विचार करा. आळस आणि निष्काळजीपणा आपल्यावर ओढवू देऊ नका. दुसऱ्या व्यक्तीला तुमच्या कामात ढवळाढवळ करू देऊ नका. दिवसभर व्यस्त असूनही कुटुंबासोबत वेळ व्यतित कराल.
मकर : आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबातील सदस्य किंवा जवळच्या व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. घराच्या देखभालीसाठी किंवा सुधारणेसाठी काही योजना असल्यास योग्य वेळ आहे, असे श्रीगणेश सांगतात. वाहन किंवा घराशी संबंधित कोणतीही वस्तू खरेदी करण्याचे नियोजन टाळणे चांगले. अचानक मोठा खर्च होऊ शकतो. हट्टीपणामुळे तुमच्या नात्यात दुरावा वाढू शकतो, याची जाणीव ठेवा.
कुंभ : श्रीगणेश म्हणतात की, आज आपल्याला काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. त्यांचा स्वीकार करा, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. घरातील कोणतीही समस्या सोडवण्यासाठी योग्य वेळ इतरांचा सल्ला चुकीचा ठरू शकतो. त्यामुळे तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. कामाच्या ठिकाणी जास्त काम होऊ शकते. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वकच करा.
मीन : श्रीगणेश सांगतात की, आज एखादी चांगली बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. तरुणांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. भावडांसोबतचा वाद टाळा. व्यवसायाशी संबंधित अधिक क्रियाकलापांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये योग्य समन्वय राहील.