ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरुवार ३० मे २०२४

निलेश पोतदार

[author title="चिराग दारूवाला :" image="http://"][/author]

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्‍ही तुमच्‍या कार्याप्रती समर्पित असाल आणि यशस्वीही व्हाल. कुटुंब आणि नातेवाईकांसोबत थोडा वेळ व्‍यतित करा. मुलांना समस्या असल्यास त्यांना मदत करणे ही तुमची जबाबदारी आहे. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. तुमची नियमित दिनचर्या आणि योग्य खाण्यामुळे आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : आज जवळच्या मित्रांची भेट होईल. मनोरंजनात वेळ व्‍यतित कराल. एखाद्या मुद्द्यावर होणारी चर्चा लाभदायक ठरेल. कुटुंबातील सदस्याच्‍या आरोग्याची चिंता राहील. घरातील कामाची जबाबदारी स्‍वत:कडेच घेवू नका.अन्यथा तुमचे महत्त्वाचे काम अपूर्ण राहू शकते. उत्पन्नासोबत खर्चही जास्त होईल. पती-पत्नीमध्ये योग्य समन्वय राखला जाईल. आरोग्‍य ठीक राहील.

मिथुन: आज अनेक महत्त्वाची कामे योग्य प्रकारे पूर्ण कराल. जवळचे नातेवाईकांच्‍या आगमनाने सुखावाल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी गांभीर्याने विचार करा. कुटुंबातील बाहेरच्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे घरातील शांतता बिघडू शकते. घरातील मोठ्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका, अशी सूचना श्रीगणेश देतात. नोकरीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांशी असलेले जुने मतभेद आज मिटतील. व्यावसायिक समस्यांचा परिणामवर कुटुंबावर होवू देवू नका.

कर्क : घरामध्ये धार्मिक कार्याशी निगडीत कामे होतील. त्यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जेचा अनुभव येईल. घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल, असे श्रीगणेश सांगतात. घाईमुळे तुमची अनेक कामे बिघडू शकतात. शेजाऱ्यांशी वाद घालू नका. कामाच्‍या व्‍यस्‍ततेतून कुटुंबासाठी वेळ काढा. आरोग्य उत्तम राहिल.

सिंह: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावातून मुक्त होण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवा, असे श्रीगणेश सांगतात. तुमच्या कलागुणांना सर्जनशील कार्यात गुंतवा. समस्यांबद्दल जवळच्‍या मित्राशी चर्चा करा. कोणत्‍याही गोष्‍टीत समजूतदारपणाने सोडवण्याचा प्रयत्न करा. तणावामुळे तुम्ही एखादी महत्त्वाची गोष्ट विसरु शकता. सद्यस्थितीत व्यावसायिक कामे मंद राहतील. जोडीदार आणि कुटुंबासोबत थोडा वेळ घालवा. तणावामुळे तुमच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो.

कन्या : श्रीगणेश म्‍हणतात की, आज कोणत्याही कामात घाई करू नका. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्‍या. तुमचा आत्मविश्वास आणि प्रतिभा विकसित होईल. घरातील मोठ्यांचा अनादर करू नका. त्यांचे आशीर्वाद आणि सहकार्य तुमच्यासाठी वरदान ठरेल. तरुणांनी झटपट यशासाठी अनैतिक कृत्यात सहभाग टाळा. पती-पत्नीचे नाते मधूर होईल. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली शारीरिक समस्येवर आराम मिळेल.

तूळ : आज आर्थिक स्थिती चांगली राहील. लोक तुमच्या औदार्याने आकर्षित होतील. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्‍या. पैसे गुंतवण्यात अडकू नका. मार्केटमध्ये तुमची प्रतीमा चांगली ठेवल्‍यास याचा लाभ होईल. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. नकारात्मक विचारांपासून लांब राहा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

वृश्चिक : श्रीगणेश म्‍हणतात की, नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी चांगले संबंध राखण्यात तुमची विशेष भूमिका असेल. तुमच्या कार्यक्षमतेची प्रशंसा होईल. सध्याच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये अधिक सुधारणा होण्याची शक्यता नाही,त्‍यामुळे अधिक मेहनतीची तयारी ठेवा. तुमच्या व्यस्ततेमुळे कौटुंबिक काळजीसाठी पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्य चांगले राहिल.

धनु : श्रीगणेश सांगतात की, दैनंदिन तणावापासून मुक्त होण्यासाठी मनोरंजनासाठी थोडा वेळ द्‍या. त्यामुळे मानसिक थकवा दूर होईल. कौटुंबिक वातावरण देखील आनंदी राहिल. आपल्या आर्थिक व्‍यवहरातील आळशीपणा टाळा. जवळचे मित्र किंवा भावंडांसोबत गैरसमज निर्माण होवू शकतो. व्यवसायात सुधारणा करता येईल. वैवाहिक नात्यात इतर कोणामुळे काही गैरसमज होऊ शकतात. आरोग्य उत्तम राहिल.

मकर: श्रीगणेश म्हणतात की, आज नशिबाऐवजी कर्मावर विश्वास ठेवणे महत्त्‍वूर्ण ठरेल. कठोर परिश्रम तुमचे नशीब उत्तम बनवेल. तुमची क्षमता आणि काम करण्याची क्षमता तुमच्यासाठी नवीन यश निर्माण करेल. जवळच्या नातेवाईकांशीही संबंध दृढ होतील. काही वेळा उत्पन्नाच्या स्रोताऐवजी जास्त खर्चामुळे मन अस्वस्थ होऊ शकते. सध्याच्या नकारात्मक वातावरणामुळे यावर ताण देणे योग्य नाही. तुमच्‍या समस्‍या जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करा.

कुंभ: जवळचे नातेवाईकांबरोबर एखाद्या विशिष्ट विषयावर चर्चा केल्याने अनेक समस्या सुटतील. घरातील वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याची योग्य काळजी आणि उपचार यावेळी खूप महत्वाचे आहेत. तुमच्या आर्थिक परिस्थितीकडे विशेष लक्ष द्या, अशी सूचना श्रीगणेश करतात. व्यवसायाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे काही गोष्टींमध्‍ये चुका होवू शकतात. कौटुंबिक समस्येवरून पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील

मीन : आज तुम्हाला संयमाने परिस्‍थिती हाताळावी लागेल. सहनशक्तीच्या जोरावर तुम्ही संकटांवर मात करू शकाल, असे श्रीगणेश सांगतात. आर्थिक स्थितीही सुधारेल. कुटुंबातील लहान मुले व तरुण यांच्या संगतीवर लक्ष ठेवा. सध्या कामाच्या ठिकाणी भागीदारी करण्याबद्दल कोणाशी संभाषण चालू असेल तर ते गांभीर्याने घ्या. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. व्यसनी लोकांपासून दूर रहा.

SCROLL FOR NEXT