आजचे राशिभविष्य, जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? File Photo
ज्योतिष आणि धार्मिक

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? |शनिवार, २९ जून २०२४

आजचे राशिभविष्य : शनिवार, २९ जून २०२४

चिराग दारुवाला

मेष : नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता

मेष

श्रीगणेश सांगतात की, आज इच्छित कार्य पूर्ण झाल्याने मनशांती लाभेल. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात, त्यासाठी प्रयत्न करत राहा. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे हानिकारक ठरेल. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. अति कामाचा भार आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतो.

वृषभ : भविष्यातील ध्येयावर लक्ष केंद्रित करा

वृषभ

श्रीगणेश म्हणतात की, भविष्यातील ध्येयावर लक्ष केंद्रित करा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. घरात काही धार्मिक किंवा अध्यात्मिक कार्यक्रमाशी संबंधित उपक्रम होतील. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. घशात इन्फेक्शनचा त्रास होवू शकतो.

मिथुन : भावांसोबत सुरू असलेले वाद शांततेने सोडवा

मिथुन

आज न्‍यायालयीन संबंधित कार्यवाही असेल आणि नंतर निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. तुमच्या सकारात्मक आणि संतुलित विचाराने काही काळापासून सुरू असलेल्या समस्यावर तोडगा निघेल. भावांसोबत सुरू असलेले कोणतेही वाद शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायासंबंधी तुमच्या भविष्यातील योजना सध्या टाळा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. वैवाहिक जीवन सामान्य राहील. तणाव आणि चिंता यामुळे निद्रानाश सारख्या तक्रारी उद्भवू शकतात.

कर्क : घरातील सुविधांवर खर्च करताना बजेट लक्षात ठेवा

कर्क

आज तरुणाई ध्येय साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. एखादे अशक्य कार्य अचानक पूर्ण केल्याने समाधान लाभेल. आपल्या वैयक्तिक बाबींची चर्चा बाहेरील लोकांसमोर करु नका. घरातील सुविधांवर खर्च करताना तुमचे बजेट लक्षात ठेवा. शेजाऱ्यांशी वाद टाळा, अशी सूचना श्रीगणेश करतात. घरातील काही समस्यांमुळे पती-पत्नीच्या नात्यात तणाव निर्माण होईल. रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.

सिंह : मुलांच्‍या शिक्षण आणि करिअरशी संबंधित कामे पूर्ण होतील

सिंह

आज मुलांच्‍या शिक्षण आणि करिअरशी संबंधित काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कुटुंबासाठी तुम्ही काही महत्त्वाचे नियम बनवाल. अनावश्यक गोष्टींकडे लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. सध्याच्या व्यवसायाव्यतिरिक्त इतर क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करा. पती-पत्नी परस्पर तडजोडीने कुटुंबाचे योग्य व्यवस्थापन करतील, असे श्रीगणेश सांगतात.

कन्या : तरुणांना त्यांच्या मेहनतीनुसार योग्य फळ मिळेल

कन्या

आज तरुणांना त्यांच्या मेहनतीनुसार योग्य फळ मिळेल. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात भर पडेल. झटपट यश मिळवण्याच्या इच्छेने कोणतेही बेकायदेशीर काम करू नका, अशी सूचना श्रीगणेश करतात. मुलांचे मनोबल टिकवण्यासाठी तुमचे सहकार्य आणि मार्गदर्शनही आवश्यक आहे. कुटुंबासाठी वेळ काढावा. खोकला, सर्दी, ताप यासारख्या ऋतुमानाच्या समस्या जाणवतील.

तूळ : तुमच्या व्यवहारात अहंकार येऊ देऊ नका

तूळ

श्रीगणेश सांगतात की, आज महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा होईल. तुम्हाला दैनंदिन जीवनाव्यतिरिक्त काही नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्याही पार पाडाल. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्लाही घ्या. तुमच्या व्यवहारात अहंकार येऊ देऊ नका. मुलांशी मैत्रीपूर्ण वागा. व्यावसायिक क्षेत्रात बाहेरच्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात.

वृश्चिक : नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल

वृश्चिक

कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. तुमच्‍या प्रयत्‍नांना यश मिळेल. विवाहयोग्य व्यक्तींशी चांगल्या संबंधांबद्दल संभाषण देखील सुरू होऊ शकते. जवळच्या नात्यांमध्ये काही काळ सुरू असलेले वाद कुणाच्या तरी हस्तक्षेपाने मिटतील, असे श्रीगणेश सांगतात. मार्केटिंगशी संबंधित कामात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येईल.

धनु : विद्यार्थ्यांनी करिअर, अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नये

धनु

तुम्‍ही आज आत्मविश्वासाने कामे सहज पूर्ण कराल. वैयक्तिक हितासाठीही वेळ काढाल. कुटुंबाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णयही घ्यावे लागतील. इतरांची जबाबदारी तुम्‍ही घेतल्याने त्रास होईल. तुमच्या क्षमतेनुसार काम करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. विद्यार्थ्यांनी निरुपयोगी कामात गुंतून आपल्या करिअर आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नये. कार्यक्षेत्रात काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल.

मकर : नोकरीशी संबंधित मुलाखतीत यशस्वी होण्याची शक्यता

मकर

आज जवळच्या नातेवाइकांशी सुरू असलेले मतभेद दूर होतील, असे श्रीगणेश सांगतात. विद्यार्थी त्यांच्या नोकरीशी संबंधित कोणत्याही मुलाखतीत यशस्वी होण्याची शक्यता आहे. कुटुंबाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, जे सकारात्मक परिणाम देतील. इतर लोकांची जबाबदारी तुमच्या डोक्यावर घेतल्याने तुमच्यासाठी त्रास होईल. त्यामुळे तुमच्या क्षमतेनुसार मदत करा. प्रिय मित्राबाबत अप्रिय माहिती मिळाल्याने मन अस्वस्थ होईल. कार्यक्षेत्रात मनाप्रमाणे काम होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

कुंभ : जमीन खरेदी-विक्रीशी संबंधित काही कामे पूर्ण होतील

कुंभ

जमीन खरेदी-विक्रीशी संबंधित काही कामे पूर्ण होतील. सामाजिक कार्यात तुमचे योगदान तुम्हाला मानसिक शांती देईल. कोणत्याही नकारात्मक सवयी सोडण्याचा संकल्प करा. कोणतीही योजना राबविण्यापूर्वी नीट विचार करावा. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे योग्‍य ठरेल. रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायिक कामे सामान्य राहतील. कुटुंबासोबत मनोरंजनाच्या कामातही वेळ जाईल, असे श्रीगणेश सांगतात.

मीन : वैयक्तिक जीवनाशी संबंधित कोणत्याही कामात धोका पत्करू नका

मीन

आज सामाजिक कार्यात सहभागी व्‍हाल. एखाद्या विशिष्ट कामाशी संबंधित योजना या आठवड्यात कार्यान्वित होतील. घराच्या देखभालीशी संबंधित काही योजना असतील. जवळच्या नातेवाईकाबद्दल शंका आणि गोंधळ असू शकतो. त्यामुळे संबंध बिघडू शकतात. वैयक्तिक जीवनाशी संबंधित कोणत्याही कामात धोका पत्करू नका, अशी सूचना श्रीगणेश करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT