जाणून घ्या तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? |  File Photo
ज्योतिष आणि धार्मिक

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शनिवार, 2८ सप्‍टेंबर २०२४

चिराग दारुवाला

Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.

मेष : तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील

मेष

मेष : श्रीगणेश सांगतात की, आज ग्रहांची स्थिती बदलणारी आहे. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. घराच्या देखभालीशी संबंधित कामांसाठी वेळ अतिशय अनुकूल आहे. नातेवाईकांशी संबंध खराब होऊ देऊ नका. बाह्य कार्यात वेळ वाया जाणार नाही, याची दक्षता घ्‍या. व्यवसायिक कामे सामान्य राहतील.

वृषभ : जवळच्या नात्यात तुमचा सन्मान राखला जाईल

वृषभ

वृषभ : श्रीगणेश म्‍हणतात की, आज कौटुंबिक आणि वैयक्तिक कामाच्‍या पूर्तते संतुलित करण्यासाठी काही योजना आखा. समाजात आणि जवळच्या नात्यात तुमचा सन्मान राखला जाईल. भूतकाळातील नकारात्मक गोष्टींना वर्तमानात वरचढ होऊ देऊ नका. जवळच्या व्यक्तीशी संबंध खराब होणार नाहीत याची दक्षता घ्‍या. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. कार्यक्षेत्रात तुमची उपस्थिती आवश्‍यक आहे.

मिथुन : आज आर्थिक अडचणी दूर होतील

मिथुन

मिथुन : आज आर्थिक अडचणी दूर होतील, असे श्रीगणेश सांगतात. सकारात्‍मक विचारांच्‍या चांगले परिणाम मिळतील. मुलांच्या भावना समजून घ्‍या. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. इतरांच्‍या सल्‍ल्‍यापेक्षा तुमच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवा. तरुणांनी आपल्‍या करिअरवर लक्ष द्‍यावे.

कर्क : वैयक्तिक संपर्कांतून कामे पूर्ण करता येतील

कर्क

कर्क : श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्ही आत्मविश्वासाच्‍या बळावर काही विपरीत परिस्थितीचे निराकरण कराल. वैयक्तिक संपर्कांतूनही काही उपयुक्त कामे पूर्ण करता येतील. आर्थिक प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काही प्रकारच्या व्यत्ययाचा सामना करावा लागू शकतो.

सिंह : वैवाहिक जीवनात गोडवा राहील

सिंह

सिंह : श्रीगणेश सांगतात की, आज आध्‍यात्‍मिक आणि धार्मिक कार्यात वेळ व्‍यतित कराल. स्थान बदलाबाबत गांभीर्याने विचार करा. जवळच्या नात्यातील वाद मिटवल्याने नात्यात गोडवा येईल. आळस आणि ताणतणाव टाळा. तुमच्या योजना आणि उपक्रम कोणालाही सांगू नका. व्यावसायिक कामांमध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. तुमची नियमित दिनचर्या तुम्हाला निरोगी ठेवेल.

कन्या : वैयक्तिक व्‍यस्‍ततेमुळे नातेवाईकांकडे दुर्लक्ष करू नका

कन्या

कन्या : श्रीगणेश म्‍हणतात की, ग्रहांचे संक्रमण तुमच्या जीवनात लाभदायक बदल घडवून आणत आहे. वेळेचे व्यवस्थापनही तुमच्या कामाच्या क्षमतेवर अवलंबून राहिल. अडचणीच्‍या प्रसंगी जवळच्या व्यक्तीचा सल्ला घ्या. वैयक्तिक व्‍यस्‍ततेमुळे नातेवाईकांकडे दुर्लक्ष करू नका. सामाजिक उपक्रमांनाही उपस्थिती आवश्यक आहे. कामाशी संबंधित नवीन धोरणांवर यावेळी चर्चा होईल.

तूळ : व्यवसायात प्रगती होईल

तूळ

तूळ : श्रीगणेश सांगतात की, तुम्ही तुमच्या योग्यतेच्‍या जोरावर प्रत्येक परिस्थितीला तोंड देऊ शकाल. कधी कधी काही नकारात्मक विचार येऊ शकतात. त्यामुळे काही वेळ अध्यात्मिक कार्यात घालवल्याने तुम्हाला मानसिक शांतीही मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात प्रगती होईल.

वृश्चिक : घरामध्ये मनोकामना आणि शुभ योजना तयार होतील

वृश्चिक

वृश्चिक : श्रीगणेश म्‍हणतात की, घरामध्ये मनोकामना आणि शुभ योजना तयार होतील. खूप दिवसांपासून सुरू असलेली चिंताही दूर होऊ शकते. कोणत्याही लाभाच्या योजनेवर काम सुरू होऊ शकते. काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा समतोल राखणे आव्हानात्मक असेल, काही जवळचे लोक तुमच्यासाठी अडथळे निर्माण करू शकतात. इतरांच्‍या बोलण्‍याकडे लक्ष देवू नका स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. कुटुंबात आनंदाचे वातावरण कायम राहील.

धनु : तुम्ही केलेल्या महत्त्वाच्या कामाचे कौतुक होईल

धनु

धनु : श्रीगणेश सांगतात की, आज कामात व्यस्त असण्यासोबतच कुटुंब आणि मित्रांसोबत मनोरंजनात वेळ जाईल. तुम्ही केलेल्या महत्त्वाच्या कामाचे कौतुक होईल. कायद्याशी संबंधित बाबींमध्ये निष्काळजी राहू नका. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. आज आर्थिक गुंतवणुकीशी संबंधित निर्णय टाळणे योग्य होईल.

मकर : आज तुमच्या सभोवतालचे वातावरण प्रसन्न राहील

मकर

मकर : आज तुमच्या सभोवतालचे वातावरण प्रसन्न राहील, असे श्रीगणेश सांगतात. घरात पाहुण्यांची ये-जा राहील. मित्रमंडळी आणि कुटुंबियांकडून सुरू असलेली कोणतीही चिंता देखील सोडवली जाऊ शकते. नोकरीशी संबंधित कोणत्याही परीक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळेल. कोणत्याही विशिष्ट विषयावर संवाद साधताना नकारात्मक शब्द वापरू नका. अनुभवाअभावी कोणतेही काम हाती घेऊ नका.

कुंभ : नेटवर्किंग आणि सेल्समधील लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात

कुंभ

कुंभ : श्रीगणेश म्‍हणतात की, ज्ञानवर्धक काळ आहे. अभ्यासाच्या कामात रुची वाढेल. प्रयत्न केल्याने इच्छित कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. हुशारीने आणि समजूतदारपणाने तुम्ही कोणत्याही संकटातून बाहेर पडाल. सामाजिक आणि राजकीय कार्यात थोडे अंतर ठेवा. घराच्या देखभालीशी संबंधित खर्च जास्त होईल. नेटवर्किंग आणि सेल्समध्ये काम करणाऱ्या लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात.

मीन : आर्थिक व्‍यवहारांबाबत सावध निर्णय घ्‍या

मीन

मीन : श्रीगणेश सांगतात की, काळ अनुकूल आहे; परंतु अडथळ्याशिवाय काम पूर्ण होणार नाही. अधिक मेहनत घ्‍यावी लागेल. विद्यार्थी आणि युवक आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतील. आर्थिक व्‍यवहारांबाबत सावध निर्णय घ्‍या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT