Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : कामात वेग वाढेल, पण घाई टाळा. नवीन संधी मिळू शकते, निर्णय विचारपूर्वक घ्या. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील.
वृषभ : आर्थिक व्यवहारात सावध राहा. जुने काम पूर्ण होण्याची शक्यता. मित्रांची मदत लाभदायक ठरेल. मनःशांतीसाठी विश्रांती घ्या.
मिथुन : संवादातून यश मिळेल. कार्यक्षेत्रात कौतुक होईल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. खर्चावर नियंत्रण ठेवा.
कर्क : कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. भावनिक निर्णय टाळा. घरातील वातावरणात सुधारणा होईल. आरोग्य सुधारेल.
सिंह : आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. नेतृत्वगुणांना वाव मिळेल. मित्रांची भेट होऊ शकते. प्रेमसंबंधात सकारात्मक बदल. जुन्या मित्रांची भेट होऊ शकते.
कन्या : कामात अडथळे येऊ शकतात. तणाव टाळण्यासाठी संयम ठेवा. आर्थिक लाभाची शक्यता. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.
तूळ : नवीन प्रकल्पाची सुरुवात शक्य. भागीदारीत यश मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आरोग्य चांगले राहील.
वृश्चिक : गुप्त योजना यशस्वी ठरतील. कामात बदलाची संधी. जोडीदाराशी संवाद वाढवा, अनपेक्षित खर्च संभवतो. यांन मुलांच्या यशाने आनंद वाढेल.
धनु : प्रवासाची शक्यता. शिक्षण किंवा स्पर्धेत यश. आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन योजना राबवण्यासाठी चांगला दिवस.
मकर : कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढेल. वरिष्ठांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. घरगुती विषयांवर लक्ष द्या. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ: सृजनशीलतेला वाव मिळेल. मित्रांसोबत वेळ आनंदात जाईल. नवीन गुंतवणूक विचारपूर्वक करा. मन प्रसन्न राहील.
मीन : धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. मतभेद मिटतील. आर्थिक लाभाची शक्यता. दिवस शांत आणि समाधानकारक जाईल.