प्रातिनिधिक छायाचित्र.  
ज्योतिष आणि धार्मिक

Shukra Gochar : ऑक्‍टोबरमध्‍ये शुक्र चारवेळा बदलणार स्‍थिती, 'या' राशींच्या जीवनात होणार मोठे बदल

शुक्र ग्रह हा धन आणि समृद्धीचा कारक मानला जातो. तो दर महिन्याला आपली राशी आणि नक्षत्र बदलतो.

पुढारी वृत्तसेवा

Shukra Gochar 2025 : धन आणि समृद्धीचा कारक मानला जाणारा ग्रह शुक्र दर महिन्याला आपली राशी आणि नक्षत्र बदलतो. ऑक्टोबर महिन्यात शुक्र एकाच वेळी चार वेळा आपली स्थिती बदलणार आहे. या बदलांचा काही राशींच्या जीवनावर मोठा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.

शुक्र ६ ऑक्टोबर रोजी उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात करणार प्रवेश

६ ऑक्टोबर रोजी शुक्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल. त्यानंतर ९ ऑक्टोबरला तो आपली राशी बदलून कन्या राशीत प्रवेश करेल. १७ ऑक्टोबरला शुक्र हस्त नक्षत्रात तर २८ ऑक्टोबरला चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शुक्राच्या या स्थिती बदलामुळे काही राशींच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी...

मेष

मेष राशीच्‍या जातकांना नवीन स्रोत निर्माण होतील

मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राच्या या बदलांमुळे अनेक लाभ होणार आहेत. शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तसेच जुन्या स्रोतांकडूनही धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी किंवा भूमिका पार पाडण्याची संधी मिळू शकते. या काळात केलेला प्रवास लाभदायक ठरेल आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहील.

धनु राशीच्‍या जातकांना परदेश प्रवासाची संधी

धनु राशीच्या लोकांसाठी शुक्राची ही स्थिती अनुकूल ठरेल. काही लोकांना परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्ही घर, जमीन किंवा वाहन खरेदी करू शकता. तुमच्या नात्यांमध्ये अधिक घट्टपणा येईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील, ज्यामुळे पदोन्नती मिळण्याची शक्यता वाढेल.

कुंभ राशीच्‍या जातकांना अचानक धनलाभाची शक्‍यता

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला आहे. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. अपूर्ण आर्थिक व्‍यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे आर्थिक स्थिती स्थिर होईल. तुम्ही तुमची ठरवलेली उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि करिअरमध्ये प्रगती होण्याचे संकेत आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

टीप: वरील माहिती ही ज्योतिष शास्त्रावर आधारित असून, ती केवळ मार्गदर्शन म्हणून विचारात घ्यावी. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT