Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi  AI Photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope 1 September 2025 |'या' राशीतील लाेकांच्या विनयशील वागण्याचे कौतुक होईल, लाभांश किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील.

Today Rashi Bhavishya in Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

मेष

मेष

मेष : कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल, तर आजच्या दिवशी ते शक्य होईल.

वृषभ

वृषभ

वृषभ : कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कारण त्यामुळे प्रिय व्यक्तींशी संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल.

मिथुन

मिथुन

मिथुन : कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षीसही मिळेल. आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो.

कर्क

कर्क

कर्क : जोपर्यंत एखादे काम पूर्ण होण्याची खात्री होत नाही, तोपर्यंत कसलेही वचन देऊ नका. एकांतात वेळ घालवणे उत्तम आहे.

सिंह

सिंह

सिंह : मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धन लाभ होऊ शकतो.

कन्या

कन्या

कन्या : अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे दिवसभराचा आनंद मावळेल, यावर मात करा, अन्यथा समस्या अधिक गंभीर बनेल.

तूळ

तूळ

तूळ : तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतविण्यासाठी चांगली वेळ, डेटवर जाणार असाल, तर वाद टाळा,

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : प्रणयाराधन आनंददायी आणि उत्साहाचे ठरेल, महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुसऱ्यांच्या दडपणाखाली वावरू नका.

धनु

धनु

धनु : चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस, अनपेक्षित लाभदृष्टीपथात असतील. त्यामुळे मनोबल उंचावेल.

मकर

मकर

मकर : आकर्षक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. पालकांच्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात कराल.

कुंभ

कुंभ

कुंभ : आर्थिक आघाडीवरील सुधारणा गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. हसतमुख वागणे कुटुंब जीवन प्रकाशमान करतील.

मीन

मीन

मीन : विनयशील वागण्याचे कौतुक होईल. लोक स्तुतिसुमने उधळतील. लाभांश किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT