जाणून घ्या तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? |  File Photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | बुधवार, १६ ऑक्‍टोबर २०२४

चिराग दारुवाला

Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.

मेष : आज तुम्ही तुमच्या एक अद्भुत ऊर्जा आणि उत्साह अनुभवाल

मेष

मेष : श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही तुमच्या एक अद्भुत ऊर्जा आणि उत्साह अनुभवाल. महत्त्वाच्‍या संधीचा पुरेपूर फायदा घेऊ शकाल. खूप दिवसांपासून अडकलेले पैसे देखील मिळू शकतात. आव्हानांचा सामना केल्यास आपण जिंकू शकता;पण एक लहानशी प्रतिक्रिया तुमचे मोठे नुकसान करु शकते, याची जाणीव ठेवा. ग्लॅमर आणि सौंदर्य उत्पादनांशी संबंधित व्यवसायात प्रगती होईल. घशादुखीचा त्रास जाणवू शकतो.

वृषभ : आर्थिक स्‍थिती सुधारण्‍यासाठी आजचा दिवस अनुकूल

वृषभ

वृषभ : श्रीगणेश म्‍हणतात की, आर्थिक स्‍थिती सुधारण्‍यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. तरुण त्यांच्या कामात नवीन उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करतील. कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळणे चांगले. कामाच्या ठिकाणी कमी वेळ जाईल. घरातील बहुतांश कामे पूर्ण होतील. पती-पत्नीचे नाते मधूर राहिल. आरोग्‍याच्‍या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नका.

मिथुन : आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा

मिथुन

मिथुन : श्रीगणेश सांगतात की, आज घरात पाहुणे येऊ शकतात. तुम्ही दैनंदिन वेळापत्रक बदलाल. दिवस तुमच्या आवडीनुसार जाईल. कोणावरही टीका करू नका. अन्‍यथा तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. भागीदारीशी संबंधित व्यवसायात महत्त्वपूर्ण ऑर्डर मिळू शकतात. पती-पत्नीचे नाते मधुर होईल. रक्तदाबाची समस्या असणार्‍यांनी काळजी घ्‍यावी.

कर्क : आत्मविश्वासाच्‍या जोरावर नवीन यश मिळवू शकाल

कर्क

कर्क : आत्मविश्वासाच्‍या जोरावर तुम्ही नवीन यश मिळवू शकाल, असे श्रीगणेश सांगतात. प्रभावशाली व्यक्तिमत्वाची भेट पैसे कमवण्याचे नवीन मार्ग उघडू शकते. मनोरंजनावरील खर्च तुमचे बजेट बिघडवू शकते त्यामुळे आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवा. व्यापारात नवीन करार होण्‍याची शक्‍यता. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. खाण्यावर नियंत्रण ठेवा.

सिंह : आज आर्थिक प्रश्‍न मार्गी लागतील

सिंह

सिंह : श्रीगणेश सांगतात की, आज आर्थिक प्रश्‍न मार्गी लागतील. जवळच्या व्यक्तीला मदत केल्याने तुम्हाला आनंदाचा अनुभव येईल. लोकांच्या टीकेमध्ये भागीदार होऊ नका; त्यामुळे तुमचे नाते आणखी बिघडू शकते. मित्रांशी भांडणे देखील सामान्य आहेत. भागीदारीशी संबंधित व्यवसायावर तुमची नजर असेल. जोडीदाराशी थोडे मतभेद होऊ शकतात. व्यायाम आणि योगासनांवर भर द्या.

कन्या : दिवस ज्ञानवर्धक आणि महत्त्वाची माहिती मिळविण्यात जाईल

कन्या

कन्या : श्रीगणेश म्‍हणतात की, आजचा काळ ज्ञानवर्धक आणि महत्त्वाची माहिती मिळविण्यात जाईल. एखाद्या प्रेरक व्यक्तीची मुलाखत होईल. मनःशांती लाभेल. दैनंदिन व्यवहारही सुरू राहतील. तुमच्या वैयक्तिक गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. सरकारी समस्यांचाही उपद्रव होऊ शकतो. कुटुंबात जोडीदाराचे पूर्ण सहकार्य असेल. पोटविकाराचा त्रास जाणवेल.

तूळ : कौटुंबिक वातावरण आनंदी राहील

तूळ

तूळ : श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही तुमच्या नवीन योजना सुरू कराल. तुमच्या स्वभावात सकारात्मक बदल केल्‍याने कुटुंब आणि नातेवाईकांमध्ये तुमची छाप कायम राहील. वडीलधाऱ्यांच्या तब्येतीची चिंता राहील. घरामध्ये जास्त शिस्त पाळणे कुटुंबातील सदस्यांसाठी निराशाजनक असू शकते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. योग्‍य आहार घ्‍या.

वृश्चिक : आज व्यवसायात काही आश्चर्यकारक यश मिळू शकते

वृश्चिक

वृश्चिक : श्रीगणेश सांगतात की, आज धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल्‍याने उत्साही वाटेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा. तुमच्या योजना व्यवस्थित सुरू करण्यासाठी तुमच्या विचारांमध्ये नकारात्मकता येऊ देऊ नका. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला व्यवसायात काही आश्चर्यकारक यश मिळू शकते. वैवाहिक जीवनात थोडा तणाव असू शकतो. वाहन काळजीपूर्वक चालवा.

धनु : महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी

धनु

धनु : श्रीगणेश म्‍हणतात की, आजचा दिवस लाभदायक आहे. कुटुंबासाठी खर्च कराल. तुमची प्रतिमा सुधारेल. नातेसंबंध अधिक घट्ट होतील. रागावर नियंत्रण ठेवा. काही व्यावसायिक सहली पूर्ण होऊ शकतात. कौटुंबिक जीवन सामान्य राहिल. महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

मकर : विशेष व्यक्तींची भेट तुमच्‍या प्रगतीसाठी पूरक असेल

मकर

मकर : श्रीगणेश सांगतात की, विशेष व्यक्तींची भेट तुमच्‍या प्रगतीसाठी पूरक असेल. रखडलेली सरकारी कामे पूर्ण करताना अधिक मेहनत करावी लागेल. मुलांसोबत तणाव राहील. व्यवसायात नवीन संपर्क लाभदायक ठरू शकतात. कोणत्याही समस्येवर तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.

कुंभ : वैवाहिक जीवनातील तणाव वाढू शकतो

कुंभ

कुंभ : श्रीगणेश म्‍हणतात की, कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे हाताळू शकाल. कीर्ती आणि सन्मान वाढू शकतो. सामाजिक उपक्रमात सहभागी व्हाल. भावंडांसोबतचे नाते थोडे बिघडू शकते. तुमच्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा तुमचे काम बिघडू शकते. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनातील तणाव वाढू शकतो.

मीन : अभ्यास करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे

मीन

मीन : श्रीगणेश सांगतात की, अभ्यास करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. उर्जा आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी चांगले साहित्य आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये रस घ्या. तुमच्या व्यक्तिमत्त्वात आश्चर्यकारक बदल होऊ शकतात. घरात बोलण्याने भांडणाची स्थिती निर्माण होऊ शकते. कधी कधी तुमचा हट्टी स्वभाव इतरांना त्रास देऊ शकतो. स्वभावात थोडी लवचिकता ठेवा. कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत करावी लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी राहिल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT