Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.
मेष : श्रीगणेश सांगतात की, आज ग्रहस्थिती अनुकूल राहील. तुमचे लक्ष आर्थिक बाबींवर असेल. जवळचे मित्र आणि नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबात चांगल्या कामाची योजना असू शकते. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. वैयक्तिक कामांबरोबरच कौटुंबिक व्यवस्थेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. व्यवसायाच्या ठिकाणी आपली उपस्थिती आवश्यक असेल.
वृषभ : श्रीगणेश म्हणतात की, आज आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. तुमच्या व्यक्तिमत्वातही सकारात्मक बदल होईल.मुलांच्या सकारात्मक उपक्रमांमुळे दिलासा मिळेल. जवळचे मित्र आणि नातेवाईक यांच्याशी संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या.
मिथुन : श्रीगणेश सांगतात की, आज कोणतेही काम करताना भावनिक निर्णय घेवू नका. तुम्हाला नवीन संधी मिळतील. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवून काम केल्याने तुमच्या अनेक समस्या सुटू शकतात. कोणत्याही प्रकारचे प्रवास टाळा. ताणतणावाचा तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. व्यवसायाशी संबंधित कामांमध्ये सकारात्मक परिणाम मिळतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
कर्क : श्रीगणेश म्हणतात की, आज ग्रहमान अनुकूल आहे. तुम्ही आत्मविश्वासाने विशेष ध्येय गाठू शकाल. तुमच्या संपर्क क्षेत्र वाढ होईल. अतिआत्मविश्वास टाळा. मार्केटिंगशी संबंधित कामांमध्ये व्यस्त राहू शकता. वैवाहिक जीवन आनंदी होऊ शकते.
सिंह : श्रीगणेश सांगतात की, आज ग्रहांची स्थिती तुम्हाला स्वतःसाठी कार्यरत राहण्याचा संदेश देत आहे. कोणताही विवेकपूर्ण निर्णय नजीकच्या भविष्यात फायदेशीर ठरू शकतो. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यांत सहभागी व्हाल. अहंकार आणि राग टाळा. जमिनीशी संबंधित कामात जास्त अपेक्षा ठेवू नका.
कन्या : श्रीगणेश म्हणतात की, ग्रहस्थिती तुम्हाला आत्मविश्वास आणि मनोबल वाढवण्यास मदत करेल. इतरांच्या सल्ल्यापेक्षा स्वत:च्या निर्णयाला जास्त प्राधान्य द्या. भावंडे आणि जवळच्या नातेवाईकांशी वाद टाळा. मार्केटिंग संबंधित कामांवर लक्ष केंद्रित करा. व्यापारातील सध्याची कामे पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. जोडीदार आणि नातेवाईकांचे सहकार्य तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
तूळ : श्रीगणेश सांगतात की, आज तुमच्या संपर्क क्षेत्रात वाढ होईल. तुमचे व्यक्तिमत्वही चांगले बदलू शकते. न्यायालयात खटला प्रलंबित असल्यास, निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. मुलांसोबत आणि कुटुंबासोबत खरेदी आणि मजा कराल. खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. तुमच्या यशाचा मत्सर करून काही लोक तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतील. अशा लोकांपासून सावध राहा.
वृश्चिक : श्रीगणेश म्हणतात की, तुमच्या वैयक्तिक बाबी आज उघड करु नका. एखादे अवघड काम अचानक शक्य झाल्याने मनाला आनंद राहील. तुमच्या मौल्यवान वस्तू, कागदपत्रे जतन करा. व्यावसायिक कामे व्यवस्थित सुरु राहतील. व्यवसायाच्या तणावाचा घरावर परिणाम होऊ देऊ नका.
धनु : श्रीगणेश सांगतात की, काही खास लोकांशी संपर्क केल्याने तुमची विचारशैलीही सकारात्मक बदलेल. तुमच्या कामाबद्दल अधिक जागरूक राहणे आणि एकाग्रता असणे तुम्हाला नक्कीच यश मिळवून देऊ शकते. जवळच्या व्यक्तीने तुमच्यावर केलेली टीका तुम्हाला निराश करू शकते. कोणावरही जास्त अवलंबून राहू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता राखणे महत्त्वाचे आहे.
मकर : श्रीगणेश म्हणतात की, आज कोणतीही दीर्घकाळ असणारी चिंता दूर होऊ शकते. अनुभवी व्यक्तीशी चर्चा करून योग्य तोडगा काढता येईल. तुमचा सकारात्मक विचार तुमच्यासाठी नवीन यश निर्माण करेल. पैशाशी संबंधित कोणत्याही विषयात वाद होऊ शकतात. रागावण्याऐवजी प्रतिकूल परिस्थितीवर शांततेने तोडगा काढा. विश्वासू मित्राशी चर्चा करून समस्या सोडवता येईल. व्यवसायात कामाचा जबाबदारी वाढू शकते.
कुंभ : श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस इतरांना मदत करण्यात आणि सहयोग करण्यात घालवला जाऊ शकतो. असे केल्याने तुम्हाला आध्यात्मिक आणि मानसिक आराम मिळू शकतो. तुमच्या नम्र स्वभावामुळे नातेवाईक आणि समाजातही आदर वाढेल. जवळच्या व्यक्तीशी वाद टाळा. अति रागामुळे परिस्थिती बिघडू शकते. कोणत्याही प्रकारच्या वादात अडकू नका.
मीन : श्रीगणेश म्हणतात की, वाहन किंवा मौल्यवान वस्तू खरेदीशी संबंधित योजना असू शकते. आज तुमच्या मेहनतीने एखादे अवघड काम साध्य करण्याची क्षमताही तुमच्यात असेल. संवादातून अनेक समस्या सोडवता येतात. तुमच्या जवळच्या नातेसंबंधावर विश्वास ठेवल्याने नाते अधिक घट्ट होईल. धीर धरण्याची हीच वेळ आहे. नोकरदारांना बढतीचा योग आहे. पती-पत्नीचे नाते मधूर होईल.