मेष : आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी छान गप्पा माराल आणि तुम्हाला जाणवेल की, तुमचे एकमेकांवर किती प्रेम आहे.
वृषभ : विद्यार्थी ज्या विषयात कमजोर आहे, त्या विषयाच्या बाबतीत तुम्ही गुरुजनांसोबत बोलू शकता. सल्ला उपयुक्त ठरेल.
मिथुन : मित्र आणि कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचा बराच वेळ व्यतीत होईल. तुमची प्रिय व्यक्ती तुमच्याकडून वचन मागेल.
कर्क : एखाद्या गोड आठवणीमुळे क्षुल्लक भांडण मिटेल. त्यामुळे कितीही भांडण झाले तरी जुने सुंदर दिवस आठवायला विसरू नका.
सिंह : पैशामुळे आज अनेक समस्या निर्माण होतील. तुमचा खर्च खूप अधिक होईल किंवा तुमचे पाकीट हरवेल. कोणताही निर्णय विचारपूर्वक करून वाटचाल करा.
कन्या : चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देईल. त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. मनावर ताबा ठेवा.
तूळ : तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भुत काम करून जाईल, जे अविस्मरणीय असेल. मन एकदम प्रसन्न राहील.
वृश्चिक : रिकाम्या वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे; पण तुम्ही आज या वेळेचा दुरुपयोग कराल आणि यामुळे मूड खराब होईल.
धनु : आजच्या दिवशी कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करणे, ही तुमची प्राथमिकता असेल. आर्थिक आवक होईल.
मकर : अवलंबून राहणे वाढण्याची शक्यता. चढ-उतारांमुळे फायदा होईल. कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा.
कुंभ : आपल्या घरातील वस्तू आवरण्याची आज तुम्ही योजना कराल; परंतु तुम्हाला यासाठी रिकामा वेळ मिळणार नाही. कोणत्या तरी कामात व्यस्त राहाल.
मीन : मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगला धनलाभ होण्याची शक्यता. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते.