Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : कामात अचानक बदल होईल. जुन्या ओळखीमुळे नवे दार उघडेल. राग व्यक्त करू नका. रात्री चांगली बातमी मिळेल.
वृषभ : आर्थिक बाबतीत सावध पाऊल फायदेशीर ठरेल. घरात एखाद्या छोट्या गोष्टीवर चर्चा वाढू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
मिथुन : संवादातून अडचणी सुटतील. नवीन कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळेल. घाईघाईत खर्च करू नका. प्रवासाचा योग.
कर्क : भावनांवर नियंत्रण ठेवल्यास दिवस हलका जाईल. कुटुंबातील व्यक्तींकडून मदत मिळेल. कामाचा ताण थोडा वाढू शकतो.
सिंह : तुमच्या निर्णयावर इतरांचा विश्वास बसेल. अडकलेले काम पूर्ण होईल. स्वतःसाठी वेळ काढा. जुन्या आठवणी जाग्या होतील.
कन्या : छोट्या गोष्टीतून मोठा फायदा मिळू शकतो. व्यवहार कागदपत्रे तपासून करा. जास्त विचार करून थकू नका. वरिष्ठांची मर्जी राहिल.
तूळ : नवे संबंध जुळतील. कलात्मक कामात यश मिळेल. आर्थिक बाबतीत समतोल राखा. आनंदाची बातमी मिळेल.
वृश्चिक : मनातले 3 बोलून टाकल्याने हलके वाटेल. कामाच्या ठिकाणी दखल घेतली जाईल. जुन्या मतभेदांवर पडदा पडू शकतो.
धनु : प्रवास किंवा भेटीगाठींमुळे दिवस व्यस्त राहील. नवीन शिकण्याची संधी मिळेल. संध्याकाळी वेळ आनंदात जाईल.
मकर : जबाबदाऱ्या वाढतील. तुम्ही सक्षमपणे सांभाळाल. घरात वातावरण सकारात्मक राहील. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल.
कुंभ : अचानक सूचलेली कल्पना उपयोगी ठरेल. कामात वेगळा मार्ग निवडाल. गैरसमज दूर होतील. मन प्रसन्न राहिल.
मीन : अंतर्मनाचा आवाज योग्य दिशा दाखवेल. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. आर्थिक निर्णय शांतपणे घ्या.