Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, पण यश मिळेल. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद सुधारेल. आरोग्यासाठी विश्रांती आवश्यक.
वृषभ : नवीन संधी चालून येतील. गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या. जोडीदाराचा चांगला पाठिंबा मिळेल. मन प्रसन्न राहील.
मिथुन : प्रवासाचे योग आहेत. महत्त्वाची माहिती मिळू शकते. कामात लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. तणाव टाळण्यासाठी ध्यान उपयुक्त ठरेल.
कर्क : घरगुती प्रश्न सुटण्यास मदत मिळेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. जुन्या मित्राशी संपर्क होईल. भावनिक निर्णय टाळा.
सिंह : तुमच्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल. नोकरीत प्रशंसा मिळू शकते. आरोग्य चांगले राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा.
कन्या : कामाचा ताण जाणवेल. नवीन योजना राबवताना काळजी घ्या. कुटुंबाचा आधार मिळेल. पुरेशी झोप, विश्रांती घ्या.
तूळ : व्यवसायात लाभहोण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जोडीदाराशी मतभेद टाळा. सकारात्मक विचार ठेवा.
वृश्चिक : अचानक 3 लाभाचा योग आहे. गुप्त शत्रूपासून सावध राहा. भावनिक स्थैर्य राखा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
धनु : शिक्षण व करिअरमध्ये प्रगती होईल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. प्रवास आनंददायी ठरेल. उत्साह वाढेल.
मकर : घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या. कामात संयम आवश्यक आहे. आर्थिक नियोजन करा. मानसिक शांतता राखा.
कुंभ : नवीन कल्पना यशस्वी ठरतील. मित्रमंडळींचा चांगला सहवास लाभेल. आर्थिक लाभसंभवतो. आरोग्य ठीक राहील.
मीन : भावनिक निर्णय घेणे टाळा. कामात विलंब होऊ शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आत्मविश्वास वाढेल.