मेष : नातेवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. प्रिय व्यक्तीकडे दुर्लक्ष केल्याने घरात काही काळ तणाव होईल.
वृषभ : तुमची मेहनत आणि चिकाटीने काम करण्याची जिद्द याचा फायदा होईल आणि त्यामुळे विश्वास आणि पाठिंबा मिळेल.
मिथुन : आपण केलेल्या कामाचे श्रेय दुसऱ्या कोणालाही घेऊ देऊ नका. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा.
कर्क: ऊर्जा बचतीची सवय दीर्घकाळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरेल. व्यस्त असूनही थकवा येणार नाही.
सिंह : दुसऱ्यांचा निष्काळजीपणा तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो. त्यामुळे काळजी घ्यावी लागेल. सकारात्मक विचार करून वाटचाल करावी लागेल.
कन्या: अंदाज न लावता येणाऱ्या स्वभावाचा परिणाम वैवाहिक आयुष्याला हानीकारक ठरणार नाही याची दक्षता घ्या.
तूळ : घरातील प्रलंबित कामे आज बराच वेळ खातील. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे; पण हार मानू नका.
वृश्चिक : नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. घरातील वस्तू आवरण्याच्या योजना कराल; पण यासाठी रिकामा वेळ मिळणार नाही.
धनु : व्यवसायातील कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता. अपेक्षित फळासाठी तुमचे सारे लक्ष प्रयत्नावर केंद्रित करावे.
मकर : भावनिकदृष्ट्या खूप असुरक्षित असाल, म्हणून दुखावले जाल, अशा परिस्थिती, प्रसंगांपासून दूर राहा, सावध राहा.
कुंभ : प्रदीर्घ काळापासून सुरू असलेले भांडण आजच सोडवा. उद्या कदाचित खूप उशीर झालेला असेल. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल.
मीन: आनंदासाठ नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. कामाच्या ठिकाणी व्यावसायिक विचारसरणीमुळे कौतुक होईल.