Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : वेगापेक्षा योग्य दिशा निवडणे महत्त्वाचे ठरेल. जुनी कल्पना पुन्हा उपयोगी ठरू शकते. घरातील व्यक्तीचे मत दुर्लक्षित करू नका.
वृषभ : बोलण्यातून एखादे दार उघडू शकते. सहकाऱ्याशी संवाद फायदेशीर ठरेल. पैशांबाबत आकर्षक वाटणारा निर्णय लगेच घेऊ नका.
मिथुन : कामाचा ताण जाणवेल, पण त्यातूनच तुमची क्षमता दिसेल. कामे पूर्ण करण्यावर लक्ष द्या. खर्च वाढेल. आर्थिक नियोजन करा.
कर्क : स्वतःसाठी घेतलेला निर्णय पुढील काळ बदलू शकतो. नोकरी-व्यवसायात तुमची दखल घेतली जाईल. संवाद मन हलके करेल.
सिंह : प्रसिद्धीपेक्षा परिणाम मिळवण्याकडे लक्ष द्या. नेतृत्वगुणांची परीक्षा होईल. नात्यात अहंकार बाजूला ठेवल्यास जवळीक वाढेल.
कन्या : सुधारणांचा मोठा परिणाम दिसेल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळू शकतो. थकीत पैसे किंवा एखादा जुना आर्थिक विषय मार्गी लागेल.
तूळ : एखादी भेट पुढे मोठी संधी बनू शकतो. कल्पनांना योग्य व्यक्तीसमोर मांडण्याची वेळ आहे. गैरसमज टाळेल.
वृश्चिक : कागदपत्रे किंवा करार बारकाईने तपासा. नवीन ज्ञान, प्रशिक्षण किंवा दूरच्या व्यक्तीकडून फायदा होऊ शकतो. घाईतील निर्णय टाळा.
धनू : मोठी संधी दिसली तरी त्यामागे धावण्याआधी किंमत तपासा. नवीन व्यक्ती भेटतील. प्रेमात स्पष्टतेमुळे नाते अधिक मोकळे होईल.
मकर : एकट्याने करण्यापेक्षा सहकार्य घ्या. भागीदारीतून काम वेगाने पुढे जाईल. पैशांबाबत दीर्घकालीन सुरक्षिततेला प्राधान्य द्या.
कुंभ : कार्यपद्धती बदलण्याची गरज जाणवेल. मनात ठेवण्यापेक्षा स्पष्ट संवाद साधा. कामाचे नियोजन सुधारल्यास वेळ, ऊर्जा वाचेल.
मीन : कल्पनाशक्तीला कृतीची जोड दिल्यास फायदा होईल. मेहनत घ्यावी लागेल; अपूर्ण कामे लांबवू नका. पैशांच्या व्यवहारात सावध राहा.