Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : आजचा दिवस आनंदाचा असेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे प्लॅन बनतील.
वृषभ : आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात शुभ कार्य ठरेल. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा.
मिथुन : नवीन कामाची संधी मिळू शकते. मित्रांकडून मदत मिळू शकेल. बोलताना विचारपूर्वक बोलावे, वाद होण्याची शक्यता आहे.
कर्क : मानसिक शांती लाभेल. घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होऊ शकते.
सिंह : आत्मविश्वास वाढेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या प्रगतीमुळे समाधान मिळेल.
कन्या : कोणताही निर्णय घाईत घेऊ नये. खर्चावर नियंत्रण ठेवावे. जोडीदाराबरोबरचे संबंध अधिक दृढ होतील.
तूळ : सामाजिक कार्यात आवड निर्माण होईल. आरोग्य चांगले राहील.
वृश्चिक : नोकरीमध्ये बढतीची शक्यता आहे. प्रवासाचे योग येतील. रागावर नियंत्रण ठेवावे, कामात अडथळे येऊ शकतात.
धनु : नशिबाची साथ मिळेल. धार्मिक कार्यात मन रमेल. प्रलंबित असलेली सरकारी कामे पूर्ण होतील.
मकर : कामाचा ताण जाणवेल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज. विश्रांती घेणे आवश्यक आहे. वाहन चालवताना काळजी घ्या.
कुंभ : उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल.
मीन : अपूर्ण कामे मार्गी लागतील. प्रिय व्यक्तीची भेट होईल. व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस आहे.