Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुटुंबीयांसोबत वेळ घालवाल. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ : व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. प्रवासाचे योग जुळून येतील.
मिथुन : नवीन योजना राबवण्यासाठी दिवस अनुकूल आहे. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराशी संवाद वाढवा.
कर्क : चिंता कमी होतील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आरोग्याबाबत निष्काळजीपणा टाळा.
सिंह : महत्त्वाच्या निर्णयांमध्ये यश मिळेल. आर्थिक लाभाचे संकेत, मान-सन्मान वाढेल. संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते.
कन्या : स्पर्धा वाढेल; पण यश तुमचेच असेल. नवीन ओळखी लाभदायी ठरतील. गुंतवणूक विचारपूर्वक करा. मानसिक शांतता राहील.
तूळ : भागीदारीत लाभमिळेल. कुटुंबातील मतभेद मिटण्याची शक्यता. विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्साहवर्धक राहील. आर्थिक स्थिती सुधारेल.
वृश्चिक : जुन्या अडचणींवर मार्ग सापडेल. व्यवहारात सावध राहा. अनपेक्षित खर्च वाढू शकतो. मित्रांच्या सहकार्याने महत्त्वाचे काम पूर्ण होईल.
धनू : नवीन संधींचे स्वागत करा. नोकरीत प्रगतीची चिन्हे. धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. प्रवासातून लाभ संभवतो.
मकर : कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक नियोजन योग्य ठरेल. मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
कुंभ : सर्जनशील कामांना चालना मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक घडामोडी होतील. यश मिळेल.
मीन : दिवस संमिश्र असेल. आर्थिक व्यवहार जपून करा. कुटुंबीयांचा सल्ला फायदेशीर ठरेल. सकारात्मक विचाराने यश मिळेल.