मेष : आनंदी ठेवण्यासाठी मुले सर्वतोपरीने प्रयत्न करतील. पैशाबाबत इतके गंभीर होऊ नका की, आपल्या नात्यालाच खराब कराल.
वृषभ : कुटुंबाला आनंद होईल. आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.
मिथुन : संयम ढळू देऊ नका. विशेषतः, कठीण समयी नियंत्रण ठेवा. पालकांच्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात कराल.
कर्क : मानसिकदृष्ट्या तुम्हाला खचल्यासारखे वाटेल, थोडा आराम करा आणि सात्त्विक अन्नसेवन केल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल.
सिंह : दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंब आनंदी होईल. प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल.
कन्या: तणावावर मात करू शकाल. घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा, यामुळे धनलाभ होऊ शकतो.
तूळ : प्रेमात आज तुम्ही अधिकाराचा वापर करा. प्रयत्नांमुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची विशेष दखल घेतली जाईल.
वृश्चिक : आनंदी दिवसासाठी मानसिक ताणतणाव आणि दडपण बाजूला सारा. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल.
धनु : आनंदी दिवसासाठी ताणतणाव बाजूला सारा. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे अर्थपुरवठा होईल.
मकर : मुलांच्या कामाचा अपरिमित आनंद होईल. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका.
कुंभ : घरातील ताणतणावामुळे चिडचिड कराल. हे तणाव दडपण्याचा प्रयत्न केलात तर त्यामुळे समस्या वाढतील. म्हणून त्यावर मात करा.
मीन : शांत राहण्याचा प्रयत्न करा. एखाद्या मित्राच्या स्वार्थी वागणुकीमुळे तुमची मनःशांती गमावून बसाल. मनावर ताबा ठेवा.