Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : प्रवासातून लाभमिळेल. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. आनंददायी घटना उत्साह वाढवेल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील.
वृषभ : कौशल्याचे कौतुक होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. नवीन योजना सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. आत्मविश्वास कायम ठेवा.
मिथुन : नवीन संधींचे स्वागत करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. प्रवासाचे नियोजन यशस्वी ठरेल. मन प्रसन्न आणि उत्साही राहील.
कर्क : व्यस्तता वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून लाभमिळेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाचा फायदा होईल.
सिंह : आर्थिक सावधगिरी बाळगा. नोकरीत जबाबदाऱ्या वाढू शकतात. जवळच्या व्यक्ती चांगला सल्ला देतील. अनावश्यक वाद टाळा.
कन्या : आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. कौटुंबिक सहकार्यामुळे अडचणी दूर होतील. कामातील सातत्य लाभ देईल. अध्यात्मात रमाल.
तूळ : महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण होतील. जुन्या मित्रांची भेट आनंद देईल. मालमत्तेशी संबंधित कामांना गती मिळेल. वाणीवर संयम ठेवा.
वृश्चिक : कामाचा ताण वाढू शकतो. संयम आणि नियोजनामुळे अडचणी दूर होतील. नवीन ओळखी भविष्यासाठी उपयुक्त ठरतील.
धनू : रखडलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.
मकर : भागीदारीत यश मिळेल. व्यवसायात लाभ होईल. जोडीदाराशी संवाद दृढ होईल. सकारात्मक विचार लाभदायक ठरतील.
कुंभ : नवीन कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. प्रवासात काळजी घ्या.
मीन : खर्चावर नियंत्रण ठेवा. निर्णय विचारपूर्वक घ्या. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. आरोग्याची काळजी घ्या.