Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : एखाद्या जुन्या कल्पनेला नवी दिशा मिळेल. कामातील अडथळा अनपेक्षितपणे दूर होईल. जवळच्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरेल.
वृषभ : शांत राहून घेतलेला निर्णय फायदेशीर ठरेल. रखडलेले काम मार्गी लागेल. कुटुंबातील व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल.
मिथुन : संवादातील तुमची हातोटी प्रभाव पाडेल. नवी ओळख उपयोगी ठरेल. आर्थिक व्यवहारात घाई टाळा. आवडीचे काम कराल.
कर्क : मनातील संभ्रम दूर होऊन आत्मविश्वास वाढेल. घरातील एखादा प्रश्न चर्चेतून सुटेल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते.
सिंह : तुमच्या कल्पकतेला योग्य व्यासपीठ मिळेल. वरिष्ठांकडून कामाची दखल घेतली जाईल. मित्रांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील.
कन्या : नियोजनबद्ध कामामुळे अपेक्षित प्रगती साधता येईल. आर्थिक बाबतीत नवा पर्याय समोर येईल. जुन्या परिचिताची भेट उत्साह वाढवेल.
तूळ : एखादी संधी तुमचा दृष्टिकोन बदलू शकते. भागीदारीच्या कामात सकारात्मक घडामोडी होतील. घरात आनंदाचे वातावरण राहील.
वृश्चिक : पडद्यामागे केलेल्या प्रयत्नांना यश मिळण्याचे संकेत आहेत. कामातील स्पर्धेत संयम राखा. आर्थिक नियोजनाला प्राधान्य द्या.
धनू : नव्या लोकांशी जोडले जाण्याचा दिवस आहे. प्रवासातून उपयुक्त माहिती मिळू शकते. कामात वेगळा प्रयोग यशस्वी होईल.
मकर : कष्टाचे चीज होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या व्यक्तीकडून सहकार्य मिळेल. रखडलेल्या आर्थिक विषयाला गती मिळेल.
कुंभ : चौकटीबाहेर विचार केल्यास फायदा होईल. एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात होऊ शकते. मित्र परिवारातून चांगली बातमी मिळेल.
मीन : आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अंतर्मनाचा कौल आज महत्त्वाचा ठरेल. सर्जनशील कामात समाधान मिळेल.