Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : दिवस उत्साहवर्धक राहील. कामात पुढे जाण्याची संधी मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. संवादाने नाती घट्ट होतील.
वृषभ : आर्थिक बाबतीत प्रगती होईल. कर्ज किंवा खर्चाचे नियोजन आवश्यक. कुटुंबासोबत वेळ घालवा. नवे मित्र मिळतील. आरोग्य सांभाळा.
मिथुन : ज्ञान व संवाद कौशल्य यामुळे ओळख वाढेल. कार्यक्षेत्रात सन्मान मिळेल. जुन्या विरोधकांशी सौहार्दाने वागा. नवीन ध्येय निश्चित करा.
कर्क : भावनिक शांती आणि संतुलन महत्त्वाचे. घरगुती कामे नीट पार पडतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. आरोग्यासाठी विश्रांतीची गरज.
सिंह : नेतृत्व क्षमता उंचावेल. मिळून काम केल्यास यश मिळेल. मित्रपरिवाराचा सपोर्ट मिळेल. खर्च वाढू शकतो, नियोजन करा.
कन्या : लहानमोठ्या समस्यांवर तुमची कुशलता सिद्ध होईल. कामात प्रगतीची दिशा दिसेल. कामात ताळमेळ साधा. प्रेमात रोमान्स अनुभवता येईल.
तूळ : निर्णयामुळे नातेवाईकांमध्ये आनंद वाढेल. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. सहकाऱ्यांशी संवाद आवश्यक.
वृश्चिक : महत्त्वाची काम पूर्ण होतील. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास लाभ. प्रेमात भावनिक बंध मजबूत होतील. कामात स्पर्धा दिसू शकते.
धनु : यात्रा किंवा शैक्षणिक गोष्टींचा विचार करता येईल. निर्णय घेताना अंतःप्रेरणा महत्त्वाची. खर्चात पडू नका.
मकर : आर्थिक नियोजन करा. प्रेमात संवाद अधिक आवश्यक. आरोग्य उत्तम राहील. पण संतुलन ठेवा. वरिष्ठांशी ओळखी वाढतील.
कुंभ: नवीन कल्पना यशस्वी होतील. पैशांचे नियोजन केल्यास लाभ. सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हा. भावना स्पष्टपणे व्यक्त करा.
मीन : सर्जनशीलतेने संधी मिळतील. आर्थिक सल्ला उपयोगी ठरू शकतो. घरातील वातावरण आनंददायक. प्रेमात विश्वास वाढेल.