Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : नवीन कल्पनांना दिशा मिळेल. कामाच्या ठिकाणी मत महत्त्वाचे ठरेल. जुन्या मित्रांसोबतची भेट आनंददायी ठरेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
वृषभ : प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी दिवस अनुकूल. महत्त्वाची चर्चा होऊ शकते. आर्थिक बाबतीत सावध राहा. निवांत वेळ काढा.
मिथुन : संवाद-कौशल्यामुळे अडचणी दूर होतील. नवीन ओळखी उपयुक्त ठरतील. प्रवासाचे नियोजन यशस्वी होईल. घाईत निर्णय घेऊ नका.
कर्क : भावनांपेक्षा व्यवहाराला प्राधान्य द्या. कामातील सातत्यामुळे वरिष्ठ प्रभावित होतील. घरात वातावरण प्रसन्न राहील. आरोग्याकडे लक्ष द्या.
सिंह : नेतृत्वगुण दाखवाल. महत्त्वाच्या व्यक्तींचा सहवास लाभदायक ठरेल. आर्थिक लाभहोईल. अहंकारामुळे नात्यांमध्ये दुरावा येऊ देऊ नका.
कन्या : योजनाबद्ध कामात यश मिळेल. नवीन कौशल्य शिकाल. कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पडतील. संभ्रम दूर होईल.
तूळ: वाद टाळता येतील. भागीदारीत प्रगती दिसेल. कलात्मक क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिवस. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.
वृश्चिक : धाडसी निर्णय फायदेशीर ठरतील. स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळेल. गुप्त योजना योग्य वेळीच उघड करा. आरोग्याबाबत निष्काळजीपणा टाळा.
धनू : नवीन अनुभवांकडे आकर्षण वाढेल. अभ्यास आणि संशोधनात प्रगती होईल. प्रवासातून महत्त्वाची माहिती मिळेल.
मकर : कार्यक्षेत्रात मेहनतीचे फळ मिळेल. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. अनावश्यक वादांपासून दूर राहा.
कुंभ : नवीन सहकार्य आणि करारांना चालना मिळेल. मान-सन्मान वाढू शकतो. चांगली संधी मिळेल. मित्रांकडून अपेक्षित मदत मिळेल.
मीन : कल्पकतेला वाव देणारा दिवस आहे. अपूर्ण कामे पूर्ण होतील. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवा. मानसिक शांतता मिळेल.