मेष : अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचे आहे हे जाणून घ्या. वाद, संघर्ष टाळा. मनावर ताबा ठेवा.
वृषभ : तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळा होऊ पाहत होते, त्यांच्या कारकिर्दीची आज तुमच्या डोळ्यादेखत उतरंड सुरू होईल.
मिथुन : व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी कठोर प्रयत्न करा. आज तुम्हाला भाऊ-बहिणीच्या मदतीने धनलाभहोण्याची शक्यता.
कर्क : करिअर नियोजन हे खेळाइतकेच महत्त्वाचे आहे. पालकांना खूश करण्यासाठी अभ्यास आणि खेळाचा समतोल साधा.
सिंह : प्रियजनांचा दिवस उजळून टाका. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्हीं या सगळ्याला पुरून उराल. सकारात्मक विचाराने वाटचाल करा.
कन्या : थोड्याशा मानसिक ताणातही आरोग्य चांगले राहील. धन कुठे खर्च होत आहे यावर नजर ठेवण्याची आवश्यकता आहे.
तूळ : धन खर्च होऊ शकते. आज तुम्ही घरात आणि घराच्या अवतीभवती काही मोठे बदल करून घेण्याची शक्यता.
वृश्चिक : प्रदीर्घ आजारावर मात करण्यासाठी हास्योपचाराचा उपयोग करा. कारण तो सर्व समस्यांवर उत्तम उपाय ठरतो.
धनु : नाटकीपणाने वागून मूळ स्वभावात वागणुकीत बदल करू नका. गुणवत्ता दाखविण्याची चांगली संधी तुम्हाला मिळेल.
मकर : पानगळी प्रमाणे प्रेम जीवन असू शकेल. आज तुम्ही प्रकाशझोतात राहाल आणि यश तुमच्या आवाक्यात येईल.
कुंभ : तुम्ही आयुष्यात आल्याने जोडीदार स्वतःला नशीबवान समजतो. या क्षणाचा पूर्ण आनंद घ्या. प्रियकराच्या आठवणीत व्याकूळ व्हाल.
मीन : आरोग्य चांगले राहील. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. आर्थिक आवक होईल.