Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope 4 May 2026: 'या' राशीला आज मिळणार आनंदाची बातमी? जाणून घ्या तुमचं राशिभविष्य

Today Rashi Bhavishya in Marathi: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : तुमच्यातील घशांत योद्धा' जागा होईल. संयम फायदेशीर ठरेल. छोट्या संधी मोठ्या दरवाजे उघडतील. मन स्थिर ठेवल्यास जिंकाल.

वृषभ

वृषभ

वृषभ : नात्यांमध्ये शब्दांपेक्षा भावना महत्त्वाच्या. नियोजन केल्यास कामाची गती वाढेल. अति विचार टाळा, साधेपणातच उत्तर आहे.

मिथुन

मिथुन

मिथुन : तुमचा संवादच तुमची ताकद ठरेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. आत्मविश्वास चमकेल. कल्पना कृतीत आणा.

कर्क

कर्क

कर्क : भावना आणि जबाबदाऱ्या यांचा तोल साधा. घरात वातावरण सकारात्मक राहील. लहान निर्णय मोठा परिणाम देतील. अंतर्मनाचे ऐका.

सिंह

सिंह

सिंह : तुमची उपस्थितीच लोकांना प्रेरणा देईल. आर्थिक सुधारणा दिसेल. कामात यश निश्चित. अहंकारा-ऐवजी नम्रता ठेवा.

कन्या

कन्या

कन्या : तपशीलाकडे लक्ष दिल्यास फायदा होईल. कुटुंबाची साथ मिळेल. ताण येईल, पण सावराल. शांत विचारातून योग्य निर्णय घ्या.

तूळ

तूळ

तूळ : बचत आणि नियो-जनासाठी उत्तम दिवस. खर्चावर नियंत्रण ठेवा. नवीन कल्पना मनात येतील. संतुलन राखल्यास यश निश्चित.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : भावनांचा ओघ वाढेल. नात्यांमध्ये गैरसमज टाळा. स्वतःशी संवाद साधणे महत्त्वाचे. आज संयम तुमचे शस्त्र आहे.

धनु

धनु

धनु : स्वतःला नव्याने ओळखण्याचा दिवस. एकांतात उत्तर सापडेल. प्रामाणिक संवाद नात्यांना बळ देईल. आत्मविश्वास वाढेल.

मकर

मकर

मकर : जबाबदाऱ्यां-मध्येही समाधान मिळेल. प्रेमात स्थैर्य आणि शांतता जाणवेल. कामात सातत्य ठेवा. लहान यश साजरे करा.

कुंभ

कुंभ

कुंभ: नवीन कल्पनांना दिशा कुटुंबाकडे लक्ष द्या. आर्थिक बाबतीत सकारात्मक संकेत आहेत. मन मोकळे ठेवा.

मीन

मीन

मीन : स्वप्न आणि वास्तव यांचा संगम घडेल. व्यवसायात प्रगती होईल. भावनांवर नियंत्रण ठेवा. दिवस आशेचा किरण देईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT