Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : भागीदारीत करत असलेल्या कामात पारदर्शकता ठेवा. आर्थिक बाजू मजबूत राहील. जुनी दिलेली उधार रक्कम परत मिळू शकते.
वृषभ : कामाच्या ठिकाणी संयम ठेवा. विरोधक तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात. व्यवसायात नवीन डील फायद्याची ठरेल.
मिथुन : लक्ष्मीनारायण योग तुमच्यासाठी भाग्योदय घेऊन येईल. नोकरीत नवी जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत. व्यापारीवर्गाला मोठा नफा होईल.
कर्क : नोकरी करणाऱ्यांनी ऑफिसच्या राजकारणापासून दूर राहावे. व्यापाऱ्यांना ग्राहकांशी बोलताना नम्रता ठेवावी लागेल. चैनीच्या गोष्टींवर खर्च टाळा.
सिंह : कार्यक्षेत्रात तुमच्या निर्णय क्षमतेचे कौतुक होईल. खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
कन्या : कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातील लोकांसाठी दिवस विशेष प्रगतीचा आहे. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे जुने कर्ज फेडण्यात यश येईल.
तूळ : कामाच्या ठिकाणी कामाचा ताण वाढू शकतो; पण सहकाऱ्यांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. भागीदारीच्या व्यवसायात सावध राहा. आर्थिक आवक चांगली राहील.
वृश्चिक : व्यवसायात कोणतेही मोठे निर्णय घेताना घाईगडबड करू नका. नोकरीत तुमचे स्थान मजबूत होईल. पैशांची कमतरता भासणार नाही.
धनु : रखडलेले काम वेगाने मार्गी लागेल. नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे. आज नशिबाच्या जोरावर मोठी आर्थिक डील फायद्यात पूर्ण होऊ शकते.
मकर : नोकरीत वरिष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. व्यावसायिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल.
कुंभ : नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी दिवस खूप शुभ आहे. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल.
मीन : कार्यक्षेत्रात काही आव्हाने येऊ शकतात; पण तुमच्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही त्यावर मात कराल. आर्थिक व्यवहारात अत्यंत सावध राहा.