Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल. आर्थिक बाबतीत संयम ठेवा. कुटुंबीयांचा पाठिंबा लाभेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
वृषभ : कामातील मेहनतीचे चांगले फळ मिळेल. जुन्या मित्राची भेट आनंद देईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. मन प्रसन्न राहील.
मिथुन : संवादकौशल्यामुळे यश मिळेल. व्यवसायात नवी संधी मिळू शकते. प्रवासाचा योग संभवतो. घाईघाईत निर्णय घेऊ नका.
कर्क : घरगुती वातावरण आनंददायी राहील. नोकरीत प्रगतीची चिन्हे दिसतील. आरोग्य सुधारेल. जोडीदाराशी सुसंवाद ठेवा.
सिंह : कठीण कामे पूर्ण होतील. मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूक विचारपूर्वक करा. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल.
कन्या : कामात शिस्त ठेवल्यास लाभ होईल. आर्थिक नियोजन यशस्वी ठरेल. कुटुंबासाठी वेळ द्या. तणाव टाळण्यासाठी विश्रांती घ्या.
तूळ : भागीदारीतील कामात फायदा होईल. नवीन ओळखी उपयुक्त ठरतील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. अनावश्यक वाद टाळा.
वृश्चिक : धैर्यान घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. कार्यक्षेत्रात कौतुक मिळेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे.
धनू : नवीन कल्पनांना उत्तम प्रतिसाद मिळेल. प्रवासातून लाभ संभवतो. कौटुंबिक आनंद वाढेल. सकारात्मक विचार ठेवा.
मकर : जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. भावनांवर नियंत्रण ठेवा.
कुंभ : नवीन संधींचे स्वागत करा. मित्रांचे सहकार्य लाभदायक ठरेल अडकलेली कामे पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील.
मीन : सर्जनशील कामात यश मिळेल. अध्यात्मात रुची वाढेल. आर्थिक लाभाची शक्यता. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतीत होतील.