Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : एखाद्याशी बोलण्याचा तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल, तर आजच्या दिवशी ते शक्य होईल. चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता.
वृषभ : तुम्ही चिंतीत व्हाल. आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी इतर आऊटडोअर उपक्रमांकडे असणाऱ्या मुलांच्या ओढ्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते.
मिथुन : काम पाहून तुमचे कौतुक, प्रगती होण्याची शक्यता. व्यावसायिक आज अनुभवी लोकांसोबत व्यवसायाला पुढे वाढवण्याचा सल्ला घेऊ शकता.
कर्क : तुमच्या चपळ कृतीमुळे तुम्हाला उत्तेजन मिळेल. यश मिळविण्यासाठी वेळकाळ पाहून तुमच्या संकल्पनांमध्ये बदल करा. दृष्टिकोन विस्तारेल.
सिंह : मुले तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत. त्यामुळे तुम्ही उद्विग्न व्हाल. तुमचा अनियंत्रित राग सर्वांना त्रासदायक ठरू शकतो.
कन्या : प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी.
तूळ : परमानंदाची अनुभूती घ्या. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी ज्याला तुमचा शत्रू समजत होतात, तो खरे तर तुमचा हितचिंतक आहे, याची तुम्हाला जाणीव होईल.
वृश्चिक : आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. व्यस्त दिनचर्येव्यतिरिक्त आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम व्हाल.
धनु : कलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. व्यापारात आज नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाला नवीन उंची देऊ शकता.
मकर : आजच्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावरील निरंतर स्मित, नवख्या माणसामध्ये आपलेपणा निर्माण करेल. गुंतवणूक योजनांचा नीट विचार करायला हवा.
कुंभ : तंदुरुस्ती आणि वजन घटविण्याचे उपक्रम आपल्या शरीरास चांगला आकार देण्यासाठी उपयोगी ठरतील. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल.
मीन : आपल्या मुलांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. कौटुंबिक व्यावसायिक प्रकल्प सुरू करु शकता. अशा कामासाठी आजचा दिवस शुभ आहे.