Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi  AI Photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope 30 July 2025 | 'या' राशीच्या व्यक्तींना कामात मिळणार यश, अडचणी होणार दूर!

Today Rashi Bhavishya in Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

 मेष

मेष

मेष : आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा. इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल.

वृषभ

वृषभ

वृषभ : मुलांच्या बाबत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल. छेडछाडीत आनंद घेऊ नका. वेळेची किंमत जाणा.

मिथुन

मिथुन

मिथुन : मैत्रीमुळे महत्त्वाच्या वेळेला खराब करू नका. मित्र हे येणाऱ्या काळातही भेटू शकतात. शिक्षणासाठी ही वेळ अधिक उत्तम.

कर्क

कर्क

कर्क : द्विधा मनःस्थितीचा आजचा शेवटचा दिवस असावा असे वाटेल. अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. येणाऱ्या काळात लाभ होईल.

सिंह

सिंह

सिंह : जोडीदाराशी दिवसभरात भांडण होईल. पण रात्री हे वाद मिटून जातील. आज तुम्ही सर्व चिंतेला विसरून स्वतःच्या सकारात्मकतेला बाहेर काढू शकता.

कन्या

कन्या

कन्या : विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आजचे काम, अभ्यास उद्यावर ढकलू नये. जेव्हाही रिकामा वेळ मिळेल तेव्हा आपले काम पूर्ण करा.

तूळ

तूळ

तूळ : कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. तुमच्या बऱ्याच समस्यांचे आज निराकरण होऊ शकते.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : बचत करण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबातील ताणतणावांमुळे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच अनेक गोष्टी शिकवतो.

धनु

धनु

धनु : करमणुकीत रमाल. मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल.

मकर

मकर

मकर : तणाव निर्माण करण्याची शक्यता. प्रेम अमर्याद, असीम असते; हे यापूर्वी ऐकले असेल. पण आज त्याचा अनुभव घ्याल.

कुंभ

कुंभ

कुंभ : उदासवाण्या वैवाहिक आयुष्यावरून जोडीदार भडकेल. कुणाची मदत करणे तुमच्या मानसिक शांतीसाठी चांगल्या टॉनिकचे काम करू शकते.

मीन

मीन

मीन : ज्याच्याशी बोलण्याची इच्छा आहे, अशाचा फोन येऊ शकतो. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात, ते कळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT