Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: 'या' राशीच्या व्यक्तींना आज अंतर्मनाचा आवाज ऐका, योग्य दिशा मिळेल; तुमची रास काय सांगते?

Horoscope 30 July 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : जुनी कल्पना नव्या रूपात उपयोगी पडू शकते. कामात धाडस दाखवाल. मित्रांकडून अनपेक्षित मदत मिळेल. स्वतःसाठी वेळ काढा.

वृषभ

वृषभ

वृषभ : आर्थिक व्यवहारांत सूक्ष्म निरीक्षण फायदेशीर ठरेल. एखादा छोटा बदल आनंदाचे कारण बनेल. कामाच्या ठिकाणी शांत स्वभाव ताकद ठरेल.

मिथुन

मिथुन

मिथुन : नवीन ओळखी उपयुक्त ठरतील. रखडलेले काम पुढे सरकेल. घाईघाईत निर्णय घेणे टाळा. आनंदाची बातमी मिळू शकते.

कर्क

कर्क

कर्क : वास्तवाला महत्त्व द्या. कुटुंबीयांसोबतचा वेळ मन प्रसन्न करेल. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. खर्चावर नियंत्रण हिताचे ठरेल.

सिंह

सिंह

सिंह : तुमचा आत्मविश्वास इतरांनाही प्रेरणा देईल. नेतृत्वाची संधी मिळाल्यास ती स्वीकारा. जुन्या गैरसमजांना पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे.

कन्या

कन्या

कन्या : छोट्या तपशीलांकडे लक्ष दिल्याने मोठा फायदा होईल. सहकाऱ्यांशी समन्वय ठेवल्यास यश मिळेल. संध्याकाळी मनशांती लाभेल.

तूळ

तूळ

तूळ : समतोल राखण्याची कला उपयोगी पडेल. नात्यांमध्ये प्रामाणिक संवाद सकारात्मक ठरेल. एखादा अपूर्ण विचार आज पूर्णत्वास जाईल.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : गुप्त प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसू लागतील. रागावर नियंत्रण ठेवल्यास वाद टाळता येतील. ज्येष्ठांचा सल्ला लाभदायक ठरेल.

धनु

धनु

धनू : ज्ञानवृद्धीसाठी केलेला प्रयत्न यशस्वी ठरेल. जुना मित्र पुन्हा संपर्क साधू शकतो. आशावादी दृष्टिकोन दिवस सुखकर करेल.

मकर

मकर

मकर : जबाबदाऱ्या वाढल्या तरी आत्मविश्वास कमी होणार नाही. कामातील सातत्यामुळे वरिष्ठांचे लक्ष वेधले जाईल. अनावश्यक वाद टाळा.

कुंभ

कुंभ

कुंभ : नवकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी उत्तम दिवस. कौशल्याचा फायदा होईल. आर्थिक नियोजन मजबूत करण्याची संधी मिळेल.

मीन

मीन

मीन : अंतर्मनाचा आवाज ऐकून घेतल्यास योग्य दिशा मिळेल. सर्जनशील कामात विशेष यश मिळू शकते. दिवस समाधानी असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT