Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कामाच्या ठिकाणी तुमचे मत महत्त्वाचे ठरेल. आर्थिक बाबतीत संयम बाळगा. कुटुंबीयांशी संवाद वाढवा.
वृषभ : दिवस थोडा धावपळीचा राहील. जुन्या कामांची पूर्तता होईल. अनावश्यक खर्च टाळा. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन : नवीन संधी तुमच्यासमोर येतील. मित्रांच्या मदतीने कामे सुलभहोतील. प्रवासाचा योग संभवतो. सकारात्मक विचार ठेवा.
कर्क : घरगुती वातावरण आनंदी राहील. कार्यक्षेत्रात प्रगतीची चिन्हे दिसतील. गुंतवणुकीत सावध राहा. भावनांवर नियंत्रण ठेवा.
सिंह : नेतृत्वगुणांमुळे यश मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. नवीन योजना आखण्यास योग्य दिवस. संध्याकाळी समाधानाची भावना राहील.
कन्या : नियोजनबद्ध कामातून लाभ मिळेल. आरोग्यासाठी वेळ द्या. आर्थिक स्थिती स्थिर राहील. कुटुंबासोबत आनंददायी क्षण मिळतील.
तूळ : भागीदारीतून लाभ होण्याची शक्यता. महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या. सर्जनशीलतेला वाव मिळेल. मनःशांतीसाठी ध्यान करा.
वृश्चिक : कामाच्या ठिकाणी बदलाची शक्यता. धाडसी निर्णय फायदेशीर ठरतील. गुप्त शत्रूपासून सावध राहा. जोडीदाराशी संवाद आवश्यक.
धनु : शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. प्रवास लाभदायक ठरेल. आर्थिक नियोजन करा. नवीन ओळखी उपयोगी पडतील.
मकर : कामात सातत्य ठेवा. वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या. अनावश्यक वाद टाळा. आरोग्य सामान्य राहील.
कुंभ : नवीन कल्पनांना चालना मिळेल. मित्रपरिवारातून सहकार्य लाभेल. खर्चावर नियंत्रण आवश्यक.
मीन : भावनिक स्थैर्य राखा. कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल होतील. जुनी देणी वसूल होतील. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील.